वसई -विरार शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य

  61

कचराकुंडीत कचरा जमा करण्याचे पालिकेकडून आवाहन

वसई : वसई-विरार शहराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. वाढते नागरिकीकरणाच्या मानाने कचराही तितकाच वाढू लागला आहे. प्रति दिन ७०० टन कचरा हा शहरातून जमा होतो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनाकडून क्षेपणभूमीवर जमा केला जात आहे.

वसई, नालासोपारा, विरार आणि नायगाव ही प्रामुख्याने शहरे व गावातील भागाचा समावेश महापालिकेत आहे. त्यामुळे घरातील ओला आणि सुका कचरा अधिक असतो. घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नियमित नियोजन केले जात आहे; मात्र तरीदेखील अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे.

पावसाळ्यात साचलेले पाणी, कचरा यामुळे डासांची उत्पत्ती होत असते. परिणामी, डेंगी, मलेरिया, ताप यांसह अन्य आजार उद्भवत असतात. आरोग्य विभागाकडून दरवर्षी सर्वेक्षण केले जाते. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करूनही खाद्यपदार्थांचे वेष्टन, नाशवंत वस्तू यांसह प्लॅस्टिकसह अन्य कचरा दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने उपायोजना आखाव्यात, अशी मागणी केली जात आहे. नागरिकांनी कचरा कुठेही न भिरकावता कचराकुंडीत जमा करावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

कचरा वर्गीकरण करावे

कचऱ्याचे वर्गीकरण करून नागरिकांनी स्वतंत्र दोन डब्यांत कचरा जमा करावा, असे आवाहन केले; मात्र तरीही वर्गीकरण होत नाही. त्यामुळे महापालिका स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना हा कचरा वेगळा करून नंतर क्षेपणभूमीवर न्यावा लागत आहे. पालिकेला सहकार्य करून कचरा वर्गीकरण करावे, असे आवाहनही वेळोवेळी केले जात आहे.

स्वच्छता विभागाकडून नियमित कचरा उचलला जात असतो. कचरा इतरत्र न टाकता प्रत्येक भागात येणाऱ्या कचरागाडीत किंवा कचराकुंडीत जमा करावा. ज्या भागात कचरा अधिक निर्माण होत असेल, तिथे नियोजन केले जाईल. - अर्चना दिवे, उपायुक्त

Comments
Add Comment

लिपी आधी मरते, मग भाषा: दीपक पवार

वसई : "भाषा नंतर मरते, पण लिपी आधी मरते. तिच्या नियमित वापराची आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. माणसं, झाडं

वसई-विरारची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

भाजपच्या ५ मंडळ अध्यक्षांना पदोन्नती विरार : भारतीय जनता पक्षाचा संघटनात्मक जिल्हा असलेल्या वसई-विरारची जिल्हा

...अखेर वाड्यातील रस्त्याची खड्डे भरून दुरुस्ती सुरू

निंबवली मार्गावरील नागरिकांनी मानले आभार अनंता दुबेले कुडूस : वाडा तालुक्यातील निंबवली - पालसई हा रस्ता अत्यंत

‘उडता वसई-विरार’ रोखण्यासाठी जनजागृती अभियान

कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त विरार : मीरा भाईंदर- वसई विरार पोलिस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या नालासोपारा,

विरार–डहाणू चौपदरीकरणाचा वेग कासवगतीने

पालघर : विरार ते डहाणू रोडदरम्यानच्या पश्चिम रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण काम अपेक्षेपेक्षा खूपच संथ गतीने सुरू

मोखाडा नगरपंचायत रिक्त पदे; कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भार

‘कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे’ मोखाडा : मोखाडा नगरपंचायत ही आता रिक्त पदांची पंचायत झाल्याचे चित्र दिसत आहे.