माथेरान पर्यटनस्थळी वाहतूक कोंडीचा तिढा सुटणे आवश्यक

विकेंडला दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे गरजेचे


माथेरान: दर विकेंडला माथेरानमध्ये मर्यादेपेक्षाही अधिक पर्यटकांची गर्दी होताना दिसते. स्वतःची वाहने आणणाऱ्या पर्यटकांना दस्तुरी नाक्यावर पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असल्याने वाहतुकीची कोंडी पहावयास मिळत आहे. लवकरच यावर तोडगा काढला पाहिजे अशी पर्यटकांमधून मागणी केली जात आहे.


काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी श्रमदान करून काहीअंशी पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला होता; परंतु माथेरानकडे पर्यटकांचा ओघ विकेंडला वाढतच असल्यामुळे दस्तुरी नाक्यावर शासकीय अधिकारी वर्गाला सुद्धा वाहनांना वाहतुकीसाठी मार्ग काढून देणे त्रासदायक बनलेले आहे. पार्किंगच्या ठिकाणी झाडांच्या भोवताली जांभ्या दगडांचे कठडे बांधले आहेत. त्यामुळे जागा व्यापलेली आहे. पार्किंगच्या जागेत जे काही अडथळे निर्माण झाले आहेत ते काढून टाकल्यास वाहनांची पार्किंग सुरळीतपणे होऊ शकते.


जवळपास सर्व जागाही वनखात्याच्या अखत्यारीत येत आहे आणि नगरपालिकासुद्धा वाहन कर आकारणी करते. त्यामुळे या दोन्ही खात्यांनी मिळून पार्किंगसाठी जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे. तेव्हाच वाहतूक कोंडी संपुष्टात येईल असे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)

सिडको-नैना क्षेत्रातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन

पनवेल तालुक्यातील ४६ गावांचा प्रश्न मार्गी लागणार पनवेल : पनवेल तालुक्यामधील सिडको व नैना अधिसूचित क्षेत्रातील

कर्जतमध्ये सुधाकर घारे यांचे जोरदार कमबॅक

नितीन सावंतांना सोबत घेऊन थोरवे आणि लाड यांना धक्का कर्जत : येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत परिवर्तन विकास

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित

विकासकामांना ग्रामस्थांनी निवडले रुपेंद्र मळेकर रोहा : रोहा नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या चुरशीच्या झालेल्या

उबाठाशी युती राष्ट्रवादीच्या फळाला आली

मुरुडकरांनी जुन्यांना नाकारले तरुणांकडे धुरा! उदय खोत नांदगाव मुरुड : मुरुड नगरपरिषदेची निवडणूक

आपली पोरं सांभाळू शकले नाहीत, ते मुंबई काय सांभाळणार?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली