Stock Market Update: शेअर बाजारात सुरूवात घसरणीने पण संध्याकाळपर्यंत येऊ शकते उसळी? काय कारणे आहेत जाणून घ्या

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. बाजाराची आर्थिक परिस्थिती पाहता आज उसळी घेण्याची शक्यता असेल. सकाळी सत्र होताना बाजारात सेन्सेक्स निर्देशांकात ८४.६० अंकाने घसरण तर निफ्टी ५० निर्देशांकात ३५.७५ अंकाने घसरण झाली आहे. मुख्यतः आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव स्तर थंडावला असला तरी अजून मंदीचे सावट पूर्णपणे गेलेले नाही. दुसरीकडे आर्थिक पातळीवर भाताच्या अर्थव्यवस्थेचे फंडामेंटल विशेषतः फायनांशियल सर्विसेस समभाग चांगल्या स्थितीत असल्याने बाजारात उसळी येऊ शकते. मुख्यतः अमेरिकन बाजारातील रोजगार दर डेटा लवकरच प्रकाशित होणार आहे. कामगार दिनाच्या निमित्ताने  डेटा प्रकाशित करण्यात येईल. दुसरीकडे मध्यपूर्वेकडील युद्धविरामानंतर ओपेक संस्था कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ करणार असल्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारातील भावना संमिश्र आहेत मात्र भारतातील श्रेत्रीय विशेष निर्देशांकात तेजी असल्याने तसेच युएस मधील तंत्रज्ञान समभाग (Stocks) मध्ये तेजी असल्याने भारतातील गुंतवणूकीसाठी वातावरण आश्वासक वाटत आहे.

आज सकाळी गिफ्ट निफ्टी सकाळी ०.११% वधारल्याने बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार प्रतिसाद देतील यावर अंतिम शिक्कामोर्तब आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. याशिवाय आणखी युद्ध टळल्यानंतर एफएफएमजी उत्पादन सुरळीत झाले आहे. याचाही फायदा सप्लाय चेनला होत आहे. अशा परिस्थितीत आज बाजारात सकारात्मक परिस्थिती कायम आहे. कालपर्यंत अमेरिकन बाजारातील डाऊ जोन्स (Dow Jones ०.५९%), एस अँड पी ५०० ( S&P 500 ०.५२%), नासडाक (NASDAQ ०.५२%) वाढ झाली होती. तर आशियाई बाजारातील निकेयी २२५ (Nikkei 225 १.४४%), व शांघाई कंपोझिट (Shanghai Composite ०.२०%) वाढ झाली असून हेगंसेंग (Hengseng ०.५३%) बाजारात घसरण झाली होती.

सकाळी सत्र उघडताच सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मात्र ०.२१%, ०.६१% वाढ झाली आहे. निफ्टी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२१,०.६४% वाढ झाली आहे. सकाळी बाजार उघडतानाच सेन्सेक्स बँक निर्देशांक (Sensex Bank Index) यामध्ये ६०.९१ अंकांने घसरण झाली आहे. बँक निफ्टीत (Bank Nifty Index) मध्ये ५०.०० अंकांची घसरण झाली.

निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सकाळी गुंतवणूकदार संमिश्र कौल देत आहेत.सकाळी रिअल्टी (०.४१%), फायनांशियल सर्विसेस (०.१८%), खाजगी बँक (०.३१%) समभागात सर्वाधिक घसरण झाली असून सर्वाधिक वाढ पीएसयु बँक (१.३५%), तेल व गॅस (०.२९%), मिडिया (०.४९%), तेल व गॅस (०.२९%) समभागात झाली आहे.

सकाळच्या सत्रात अलेमबिंक फार्मा (८.५९%), आवास फायनांशियर (३.४४%), जेएम फायनांशियल (३.१७%), हिमाद्री स्पेशल (३.१५%),अरबिंदो फार्मा (३.०७%), हिताची एनर्जी (२.८५%), बँक ऑफ महाराष्ट्र (२.५२%), झेन टेक्नॉलॉजी (२.५१%),आयडीबीआय बँक (२.२४%),सिमेन्स (२.२४%), पंजाब नॅशनल बँक (१.७०%), बँक ऑफ बडोदा (१.६७%), कॅनरा बँक (१.६१%), इंटरग्लोब एव्हिएशन (१.४६%), आयआरएफसी (१.२६%), अव्हेन्यू सुपरमार्ट (१.०३%),एलआ यसी (०.६९%), ओएनजीसी (०.८६%), सिप्ला (०.३७%), टाटा मोटर्स (०.२९%) या समभागात वाढ झाली आहे.

तर सर्वाधिक घसरण जेबी केमिकल (६.०३%), भारती हेक्साकॉम (३.५२%), ज्योती सीएनसी (३.०२%), कोरोमंडलम इंटरनॅशनल (२.०५%), हिरो मोटोकॉर्प (१.९१%), एसबीआय कार्ड (१.८९%), महानगर गॅस (१.६५%), टोरंट पॉवर (१.५८%), अदानी गॅस (१.०७%), टीव्हीएस मोटर्स (१.०३%), टाटा कंज्युमर (१.०३%), सुझलोन एनर्जी (०.७३%), लोढा डेव्हलपर (१.०१%), एनटीपीसी (०.९५%), कोटक महिंद्रा (०.७३%), भारती एअरटेल (०.६०%),अदानी एंटरप्राईजेस (०.५७%), युनायटेड स्पिरीट (०.५१%), टाटा पॉवर (०.५७%), वरूण बेवरेजेस (०.४१%), जेएसबब्लू स्टील (०.४१%) या समभागात झाली.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले,'एस अँड पी ५०० आणि नॅस्डॅकने नवीन विक्रमी उच्चांक प्रस्थापित केले आहेत आणि बहुतेक इतर बाजारपेठा तेजीच्या स्थितीत आहेत, त्यामुळे बाजाराची रचना सकारात्मक दिसते. पश्चिम आशियातील भूराजकीय तणावात घट, ब्रेंट क्रूडची ६७ डॉलर्सपर्यंतची तीव्र घसरण आणि अमेरिका आणि चीन आणि अमेरिका आणि काही प्रमुख व्यापार भागीदारांमधील व्यापार करारांच्या शक्यतांसह व्यापार आघाडीवर सकारात्मक घडामोडींचे वृत्त शेअर बाजारांसाठी चांगले संकेत देत आहे.अलीकडच्या काळात भारतातील तेजीत एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आर आयएल आणि एल अँड टी सारख्या लार्ज कॅप कंपन्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, ज्यात संस्थांनी गर्दी केली आहे. डॉलर निर्देशांकातील कमकुवतपणा एफआयआयच्या प्रवाहाला पाठिंबा देत आहे आणि किरकोळ आशावाद देशांतर्गत निधीमध्ये प्रवाहाला पाठिंबा देत आहे.या तेजीच्या बाजारात गुंतवणूक करणे अर्थपूर्ण आहे परंतु उच्च मूल्यांकनावर नवीन गुंतवणूक करणे धोकादायक ठरेल.'

आजच्या बाजारातील परिस्थिती पाहता सकारात्मकता कायम दिसत असली तरी गुंतवणूक करताना खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : भारताच्या भविष्यातील विकासाचे मुख्य केंद्र नवी मुंबईच; "मेघालय भवन" विकास संस्कृती आणि एकात्मतेचा संगम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

'मेघालय भवन' उभारणीसाठी जमीन हस्तांतरण व भूमीपूजन सोहळा

Law Admission Update : 16 कॉलेजांना 100% प्रवेशाची परवानगी; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या विधि प्रवेश (Law Admission 2026) प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक

Messi and Ronaldo : लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोला बॉम्बने उडवण्याचा आणि हत्येचा कट; एफबीआयचा धक्कादायक अहवाल उघड

फुटबॉल विश्वातील दोन महान हस्ती आणि जगभरातील कोटींच्या हृदयावर राज्य करणारे खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि

Abhijeet Dipke : अभिजीत दिपकेविरोधात तरुणांचे आंदोलन, दिपकेकडून माफीची मागणी

बीड : नीट पेपरफुटी विरोधात आधी सोशल मीडियात कॅम्पेन नंतर जंतरमंतरवर सोनम वांगचुकच्या सहकार्याने आंदोलन

Tata Safari EV Launched : टाटाचा नवा धमाका! लोकप्रिय Safari आता इलेक्ट्रिक रुपात; दमदार फीचर्ससह महिंद्राला टक्कर

भारतीय ऑटोमोबाईल विश्वात आघाडीवर असलेल्या टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहन (EV) क्षेत्रात आणखी एक मोठा निर्णय घेतला

Heart Attack : सलमान खानच्या घराबाहेर बंदोबस्तात असलेल्या पोलिसाचा मृत्यू; ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील 'गॅलेक्सी अपार्टमेंट' या निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी