एसटी बसच्या एक्सलचे नट लुज; चालकांनी चालवली बस

श्रीवर्धन : मुंबईवरून बोर्लीकडे आलेली बस बोर्लीवरून आदगाव, सर्वे तसेच दिघीकडे मार्गस्थ होत असताना बोर्ली येथील जागृत नागरिकांच्या कर्तव्य दक्षतेमुळे मोठी दुर्घटना होताना टळली आहे.


सदरील बस बोर्ली स्थानकामध्ये उभी असताना मागील टायरचे एक्सेलचे नट लूज असल्याचे निदर्शनास आले. यानंतर चालकाला कल्पना देऊन बस बाजूला लावण्यास सांगितले. डिप्रेशनच्या सहाय्याने टायरला फिरवण्याचे काम करणाऱ्या एक्सलला एकूण ८ नट असतात. त्यापैकी फक्त ३ नट एक्सलला लागले होते. तर बाकीचे ५ नट पडून गेले होते. तसेच असलेले ३ नट सुद्धा हाताने फिरत होते. बसची अशी अवस्था असताना बस का बरं सोडण्यात आली होती.


हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. यामध्ये चालकाचा सुद्धा हलगर्जीपणा दिसून येत आहे. बस मुबईकडून श्रीवर्धनकडे येताना पनवेल, पेण तसेच इतर पुढील स्थानकांत थांबली होती. यावेळी चालकांनी याकडे लक्ष दिले नाही का? दिले असेल तर याची कल्पना संबंधित विभागाकडे दिली होती का याची नोंद करण्यात आली आहे का? ही बस श्रीवर्धनकडे येताना वेडी-वाकडी वळणे, चढ-उतार घेत येते.


याठिकाणी एक्सल बाहेर पडला असता तर चालकाला बस नियंत्रणात आणणे शक्य झाले असते का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनुचित घटना घडली नाही म्हणून विषय सोडून देण्यापेक्षा प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाई सुद्धा झाली पाहिजे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

Comments
Add Comment

पेण अर्बन बँकेच्या संचालकांकडून प्रत्येकी २४ कोटींची वसुली?

बँक घोटाळ्यात सहकार आयुक्तांनी निश्चित केली सामूहिक जबाबदारी सुभाष म्हात्रे अलिबाग : पेण अर्बन बँक घोटाळ्यातील

अलिबाग नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

उबाठा गटाचे स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे संकेत अलिबाग : अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची घोषणा

महाडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप युती

राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्ष पद आणि १५ जागा महाड : ऐतिहासिक महाड नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

जंजिरा किल्ला तब्बल नऊ दिवसांनी पर्यटकांसाठी झाला खुला

मुरुड : मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची मांदियाळी येत असते. अचानक हवामानात बदल

करंजाचा धाडसी युवक आतिश कोळी ठरला ‘देवदूत’

वादळात अडकलेल्या १५ खलाशांचा वाचवला जीव अलिबाग  : उरण तालुक्यातील करंजा पाडा येथील आतिश सदानंद कोळी या युवकाने