Nirmala Sitharaman: निर्मला सीतारामन आजपासून स्पेन, पोर्तुगाल, ब्राझील दौऱ्यावर! FFD4 व Bricks मध्ये होणार 'ही' महत्वपूर्ण चर्चा!

प्रतिनिधी: केंद्रीय अर्थमंत्री व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन ३० जून ते ५ जुलै दरम्यान स्पेन, पोर्तुगाल, ब्राझील या देशात अधिकृत दौरा करणार आहेत. सीतारामन भारताचे प्रतिनिधित्व करून आर्थिक बाबींवर सांगोपांग चर्चा करणार आहेत. वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, निर्मला सीतारामन या भारताचे प्रतिनिधित्व करून चौथ्या फायनासिंग डेव्हलपमेंट आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स (4th International Conference on Financing Development FFD4) या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.


'From FFD5 Outcome to Implementation: Unlocking the potential of Private Capital for susitanable Development ' या परिसंवादात आपले भाषण करणार आहेत. सिवेली स्पेन (Seville Spain) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत विकास व खाजगी गुंतवणूक याविषयावर हा परिसंवाद होऊ शकतो. याशिवाय निर्मला सीतारामन या जर्मनी, पेरू, न्यूझीलंड येथील मंत्रीगणांना भेटणार असून त्या युरोपियन इनव्हेसमेंट बँकेच्या अध्य क्षांनाही भेटणार आहे असे वित्त मंत्रालयाने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.


याखेरीज लंडन, पोर्तुगाल येथील आपल्या भेटीत व्यापारावर द्विपक्षीय चर्चा (Bilateral Discussion) होणार आहे असे संकेत मिळत आहेत.मुख्यतः परदेशी गुंतवणूकदार, व त्या देशातील अनिवासी भारतीय गुंतवणूकदार यांच्याशी त्या चर्चा करू शकतात.


एनडीबी (New Development Bank) येथे दहावी वार्षिक बैठक होणार आहे. यामध्ये ' Building Multilateral Development Bank for Global South' या विषयी सितारामन आपले भाषण करतील. एनडीबीचा कार्यक्रम रिओ डे जेनेरियो (Rio De Janeiro) येथे होणार आहे.भारताचा गर्व्हनर म्हणून सीतारामन उपस्थित राहणार आहेत. याशिवाय Bricks Finance Ministers व Central Bank Governors Meeting या कार्यक्रमांनाही सीतारामन हजेरी लावणार आहेत. ब्राझील, रशिया, चीन, इंडोनेशिया या देशातील प्रतिनिधींशी एनडीबी बैठकीत चर्चा करणार आहेत.


यापूर्वी नुकत्याच झालेल्या नवी दिल्लीतील बैठकीत पीएसयु (सरकारी) बँकेच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना बँकेच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. ज्यामध्ये सायबर सिक्युरिटी, ग्राहक केंद्रीत सुविधा, कर्ज पुरवठा या विविध बाबींचा पाठपुरावा त्यांनी केला होता. मध्यंतरी पीएसयु बँकांना १.७८ लाख कोटींचा नफा झाला होता. एनपीए (Non Performing Asset) यामध्ये लक्षणीय घट झाली होती. इयर ऑन इयर बेसिसवर ही घट साधारणतः ०.५२% होती.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

दिलीप प्रभावळकरांच्या ‘दशावतार’ ची आता मल्याळम भाषेत धडाकेबाज एन्ट्री!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत यंदा एकाच चित्रपटाची सर्वाधिक चर्चा झाली तो म्हणजे ‘दशावतार’! १२ सप्टेंबर २०२५

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीने केली पतीची हत्या! पत्नीचे नगरसेवक होण्याचे स्वप्न, पती संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी...

पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये समाजकार्यात सक्रिय असणारे नकुल भोईर (वय ४०) यांची हत्या करण्यात आली आहे. नकुल भोईर यांची

खासदार नारायण राणे यांचा चिपळूण, देवरूख, रत्नागिरीत जनता दरबार

रत्नागिरी: जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार

दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय

रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावर दिवा-चिपळूण मेमू रेल्वे कायमस्वरूपी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.