नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश


नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. भुजबळांचा कट्टर समर्थक मानला जाणारा नांदगाव शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील महाजन वाडा तील सर्व रहिवाशी नागरिकांनी माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांच्या निर्णया सोबत राहून शिवसेना पक्षात प्रवेश केला. आ.सुहास कांदे व सौ अंजुम कांदे यांच्या उपस्थितीत सर्वांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला.


यावेळी बोलताना वाल्मीक टिळेकर यांनी मागील दहा वर्षांपासून माजी आमदार सोबत काम केले पण अपेक्षित कामी झाली नाहीत आणि आमदार सुहास कांदे यांची कार्यपद्धत आधीपासूनच आवडत होती आता सर्व समर्थकांकडून आम्ही हा निर्णय घेतला आहे यापुढे आम्ही अण्णांसोबत विकास कामांच्या सोबत आहोत असे मत व्यक्त केले. याप्रसंगी वाल्मिक टिळेकर यांना नांदगाव तालुका संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली.


सोबतच गणेश पंडित सोमासे यांची युवा सेना विभाग प्रमुखपदी , शरद तुळशीराम महाजन यांची युवा सेनेच्या नांदगाव शहर उपाध्यक्षपदी, सतीश परशुराम महाजन यांची युवा सेनेच्या शहर सहसंघटक पदी, तर डॉ. वाल्मीक भास्कर महाजन यांची शिवसेना नांदगाव शहर संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.


याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर अमोल नावंदर यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शिवसेना पक्ष स्वागत केले.


याप्रसंगी दत्तात्रय महाजन, प्रवीण टिळेकर,सुदाम महाजन, समाधान आहेर, सचिन सोमासे, नागेश सोमासे, नितीन वाघ, अशोक निकम ,अशोक पैठणकर, बबन इप्पर, गंगाधर जाधव, मधुकर खैरनार, गणेश पाटील, रवींद्र सोनवणे, परशुराम जाधव, नारायण सोनवणे,नवनाथ गोजरे, मच्छिंद्र टिळेकर, विकास टिळेकर, महेश टिळेकर, किरण टिळेकर, कमलेश टिळेकर, गोरख सरोदे, राज सरोदे, रोहिदास वाघचौरे, सौरभ पैठणकर, यशवंत चौगुले, हिरामण हातेकर, अमोल भावसार, बाळू रोकडे, मनोज मोरे, मनोज गवळी, निवृत्ती आहेर, अनिल सावंत,नवनाथ गोदरे, मनोज निकम,सुभाष चौधरी,मनोज मोरे,मनोज गवळी, किरण आहेर, प्रदीप आहेर महिलांमध्ये योगिता महाजन ,सुरेखा सोमासे,पुनम सोमासे,ज्योती टिळेकर, दिपाली टिळेकर, मनीषा खैरे, ज्योती शिंदे, स्वप्नाली गोदरे, मनीषा चौधरी, चंद्रकला सोनवणे,मंदाबाई सोनवणे, दिपाली आहेर, प्रियंका सूर्यवंशी,पूनम सोमासे, राणी सोनवणे, सुनीता सदाफुले, पूजा सावंत, कल्पना गायकवाड, वंदना इप्पर,मयुरी गवळी, गायत्री गोसावी, शितल आहेर, नीता गवळी, पाटील मॅडम, अक्षदा आढाव, मनीषा वाघ इत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Add Comment

RSS : कोण शत्रू, कोण मित्र ? हे पहलगामच्या घटनेने शिकवले'

नागपूर : ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव झाला. या उत्सवात बोलताना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, माजी राष्ट्रपतींची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी

दुकाने, हॉटेल्ससह इतर आस्थापने २४ तास खुली राहणार!

मुंबई : राज्यभरातील दुकाने २४ तास खुली ठेवण्यास परवानगी असणार आहे. राज्यातील महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे.

शिंदेंचं एक पाऊल मागे! निवडणुकीत शिवसेना धाकटा भाऊ होणार, शिंदेंना कमी जागा मिळणार?

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डावपेच आणि रणनीतीमुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा बॅकफूटवर गेलेत.

Gautami Patil : मोठी बातमी! पुण्यात गौतमी पाटीलच्या वाहनाचा मोठा अपघात, नेमकं घडलं तरी काय?

पुणे : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) तिच्या कार्यक्रमांना होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे

गौतमी पाटीलच्या गाडीला पुण्यात अपघात, रिक्षाचालकासह ३ जखमी

पुणे: प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कारला पुण्यात भीषण अपघात झाला. पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय