
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे प्रतिपादन
ठाणे : पर्यावरण पूरक व पैशाची बचत करणारा इ-ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात देशातील पहिल्या इ-ट्रॅक्टरची नोंदणी करताना बोलत होते. यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिणी पाटील, इ-ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या ॲटोनेक्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे व सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे हे उपस्थित होते.
पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला भाजपाची राजकीय खेळी! महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबई: राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोठी राजकीय खेळी खेळण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये उबाठा ...