Devendra Fadnavis : दोन भावांनी एकत्र येऊ नये असा GR मी काढलाय का? दोघांनी एकत्र यावं अन् क्रिकेट खेळावं; आम्हाला काहीही फरक... : मुख्यमंत्री फडणवीस

  102

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेसंबंधी काढण्यात आलेले जीआर राज्य शासनाने रद्द ठरवले. हा मराठी माणसाच्या एकजुटीचा विषय असल्याचं ठाकरे बंधूंनी सांगितलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही निर्णय घेताना कोणत्याही पक्षाचं हित पाहणार नाही, आम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं हित पाहणार. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली न येता योग्य तोच निर्णय घेऊन असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. दोन ठाकरे बंधू एकत्र येऊ नये असा काही जीआर आम्ही काढला नाही, त्यांनी एकत्र यावं आणि किक्रेट खेळावं, जेवण करावं. आम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.



काय म्हणाले फडणवीस ?


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या नेत्याने हिंदी सक्तीची करा अशी शिफारस केली होती. तो अहवाल उद्धव ठाकरेंनी स्वीकारला. त्यामुळे हिंदीचा निर्णय त्यांच्या कार्यकाळातच झाला होता. हे दुटप्पी लोक आहेत. याचं सत्तेतले रुप वेगळं आणि विरोधातले रुप वेगळं आहे."



क्रिकेट खेळावं अन् टेनिस खेळावं


ठाकरे बंधू एकत्र न येण्यासाठी भाजप प्रयत्न करतंय का असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये म्हणून मी जीआर काढलेला नाही. दोन भावांना एकत्र येण्यासाठी मी रोखलंय का? त्यांनी एकत्र यावे, क्रिकेट खेळावं, टेनिस खेळावं, जेवण करावं, काहीही करावं आम्हाला काहीही फरक पडत नाही." पुढे फडणवीस म्हणाले की, "राज्यात त्रिभाषा सूत्र स्वीकारायचं की नाही यावर आम्ही एक समिती नेमली आहे. ती समिती आता ठरवेल. आम्ही कुठल्याही पक्षाचं हित पाहणार नाही. आम्ही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं हित पाहणार. कुणाच्याही दबावाखाली झुकणार नाही."

Comments
Add Comment

बेस्ट पाठोपाठ मुंबई महापालिका बँकेच्या निवडणुकीत उबाठाच्या जय सहकारचा धुव्वा

युवा सेनेच्या प्रदीप सावंत यांच्यासह अनेकांचा पराभव मुंबई : बेस्ट पाठोपाठ दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

येत्या ०४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना नोंदवता येणार हरकती, सूचना मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक