पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला भाजपाची राजकीय खेळी! महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई: राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मोठी राजकीय खेळी खेळण्यात आली आहे.  उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकमध्ये उबाठा पक्षाला  खिळखिळा करण्यासाठी भाजपाने पक्षप्रवेशाचा जो काही सपाटा लावला आहे, त्यामध्ये त्यांना आणखी एक मोठे यश लाभले आहेत. लवकरच उत्तर महाराष्ट्रातील दोन बडे नेते हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील (Kunal Patil) आणि नाशिकचे माजी आमदार अपूर्व हिरे (Apurva Hire) हे दोघे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.


धुळे येथील माजी आमदार कुणाल पाटील आणि नाशिकचे अपूर्व हिरे हे दोघेही येत्या 1 जुलै रोजी होणाऱ्या रवींद्र चव्हाण यांच्या संभाव्य प्रदेशाध्यक्ष पदग्रहण सोहळ्यात भाजपमध्ये औपचारिकरित्या सहभागी होतील, असे सांगण्यात येते.


अपूर्व हिरे हे शिक्षक मतदार संघाचे आमदार होते. 2019 मध्ये अपूर्व हिरे यांनी भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेल्या सुधाकर बडगुजर यांना विरोध करणाऱ्या सीमा हिरे यांनी अपूर्व हिरे यांच्या भाजपा प्रवेशाचे स्वागत केले आहे. सुधाकर बडगुजर यांना शह देण्यासाठी अपूर्व हिरे यांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.



धुळ्यात भाजपची ताकद आणखी वाढणार


कुणाल पाटील हे धुळ्यातील काँगेसचे माजी आमदार आणि प्रमुख नेते होते. या पट्ट्यात त्यांचा प्रभाव आहे. कुणाला पाटील याच्या प्रवेशामुळे धुळ्यात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. कुणाल पाटील हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जातात. मात्र, आता त्यांनीही पक्षाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून समर्थक आणि कार्यकर्त्यांना भाजप प्रवेश याबाबतचा निरोप पाठवण्यात आल्याची माहिती कुणाल पाटील यांच्या समर्थकांकडून देण्यात आली आहे.



उबाठा  गटाला नाशिक जिल्ह्यातून सलग धक्के


अलीकडच्या काळात उबाठा  गटाला नाशिक जिल्ह्यातून सलग धक्के बसत आहेत. आधी सुधाकर बडगुजर, त्यानंतर विलास शिंदे या दोन स्थानिक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची मशाल सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. या पार्श्वभूमीवर अपूर्व हिरे यांचा प्रवेश ठाकरेंना आणखी कमजोर करणारा ठरू शकतो. नाशिक महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपच्या या हालचाली मोठा राजकीय फरक घडवू शकतात.



शरद पवार गटाचे विजय भांबळे अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार


शरद पवारांची साथ सोडून उद्या माजी आमदार विजय भांबळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. सेलू-जिंतूर मतदारसंघातून त्यांनी भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. नवाब मलिक यांच्या प्रयत्नांमुळे हा पक्षप्रवेश घडत असल्याची चर्चा आहे. मुंबईतील महिला विकास महामंडळ कार्यालयात हा प्रवेश कार्यक्रम पार पडणार असून त्याला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हजेरी लावणार आहेत.


Comments
Add Comment

Pakistan : इराण-अमेरिका युद्धाचा पाकिस्तानला दणका; इंधनाचे दर भडकल्याने जनता रस्त्यावर, देशात 'एनर्जी लॉकडाऊन'!

इस्लामाबाद : इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे शेजारील देश असलेल्या पाकिस्तानची झोप

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Donald Trump : आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल...;डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा

वॉशिंग्टन : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)