पुण्यात दिसले इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर

पुणे : इस्रायल - इराण दरम्यान युद्धबंदी झाल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले असले तरी दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे. हे असे वातावरण असतानाच पुण्यात इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर झळकले. शिया मुसलमानांच्या कार्यक्रमात इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर झळकले. हा प्रकार कळताच पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पोलिसांनी पुणे महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने कार्यक्रमस्थळावरुन इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर हटवले. यानंतर तणाव निर्माण झाला. पोलिसांनी प्रयत्नपूर्वक परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाजवळ हवेली तालुक्यातील कदमवाकवस्तीतील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर झळकले. हा प्रकार कळताच पोलिसांनी धावपळ केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करुन इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर हटवले. लोणी काळभोर परिसरात इराणच्या समर्थनासाठी घोषणाबाजी करणाऱ्यांनाही पोलिसांनी योग्य पद्धतीने समज दिली. पुन्हा पोस्टर किंवा झेंडे झळकणार नाही, याची हमी मिळाल्यानंतरच पोलीस घटनास्थळावरुन निघून गेले.

हिंदू संघटना संतापल्या

आंतरराष्ट्रीय परिषद नसताना एखाद्या ठिकाणी दुसऱ्या देशाचे झेंडे आणि तिथल्या नेत्याचे पोस्टर झळकवण्याची आवश्यकताच नाही. पण पुण्यात इराणचे झेंडे आणि खामेनेईंचे पोस्टर झळकवण्यात आले. हा प्रकार कळताच हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू संघटनांनी केल्याचे वृत्त आहे.
Comments
Add Comment

'ठाकरें'ना दसऱ्यालाच मोठा झटका! ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के, कोकणातील नेता शिंदे गटात दाखल

दसऱ्यादिवशीच मेळाव्यातच केला प्रवेश; कोकणातील माजी आमदार राजन तेली यांचा प्रवेश मुंबई: शिवसेना (उद्धव

जरांगेच्या डोक्यात शिजतंय काय? मराठ्यांपाठोपाठ आता शेतक-यांचा मसिहा बनणार, बघा कोणत्या केल्या मागण्या

मनोज जरांगेंची सरकारकडे ८ मोठ्या मागण्यांची यादी, शेतकऱ्याला दरमहा १०,००० पगार ते संपूर्ण कर्जमाफी जरांगेंचा

'असे हलके वागणारे माझे नाहीत!' गोंधळ घालणाऱ्या समर्थकांवर पंकजा मुंडे कडाडल्या

भगवान गडाचा वारसा हिरावून घेणाऱ्यांवर पंकजा मुंडेंचा हल्लाबोल बीड:

'जातीपातीचे राक्षस' संपवा! दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंचं आक्रमक आणि भावनिक आवाहन

'मी गोपीनाथ मुंडेंची बेटी आहे,' म्हणत पंकजा मुंडेंनी जागवल्या आठवणी जा

RSS : कोण शत्रू, कोण मित्र ? हे पहलगामच्या घटनेने शिकवले'

नागपूर : ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव झाला. या उत्सवात बोलताना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, माजी राष्ट्रपतींची उपस्थिती

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने यंदा नागपूरमध्ये भव्य विजयादशमी