मोबाईलवरून आता मतदान

ई-मतदानाला परवानगी देणारे बिहार पहिले राज्य
मतदान केंद्रांवर पोहोचू न शकणाऱ्या मतदारांसाठी ही सुविधा


पाटणा : घरबसल्या आता मोबाईलवरून मतदान करता येणार आहे. मोबाईल फोन ॲपद्वारे ई-मतदानाला परवानगी देणारे बिहार देशातील पहिले राज्य ठरले आहे. शनिवारी पाटणा, रोहतास आणि पूर्व चंपारण या तीन जिल्ह्यांतील सहा नगर परिषदांमध्ये मोबाईलवरून मतदान झाले. विशिष्ट मतदारांना E-SECBHR ॲपद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध केली गेली. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, गरोदर महिला आणि स्थलांतरित मतदारांना या योजनेचा लाभ घेता आला आहे. बिहार राज्यातील हा प्रयोग यशस्वी झाल्यास देशभरात मोबाईलवरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते.


ई-मतदानासाठी नोंदणी
भारतात प्रथमच मोबाईल ॲपद्वारे मतदान करता येणार आहे. हे मतदान प्रथम बिहारमध्ये झाले आहे. ज्यामुळे देशाच्या लोकशाही प्रक्रियेत एक नवे युग सुरू होणार आहे. सहा नगर परिषदांच्या निवडणुकीत हा पथदर्शी प्रकल्प राबवला जात असून, मतदान केंद्रांवर पोहोचू न शकणाऱ्या मतदारांसाठी ही सुविधा आहे. यामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञान, चेहरा ओळख प्रणाली आणि डिजिटल सुरक्षा यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांचा वापर करून मतदान प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शक ठेवण्यात येणार आहे.


बिहारचे राज्य निवडणूक आयुक्त दीपक प्रसाद यांनी सांगितले की, “१० हजार मतदारांनी ई-मतदानासाठी नोंदणी केली असून, ५० हजार मतदारांना मतदान केंद्रावर न जाता मोबाईलद्वारे मतदान करता येईल.”


हे ॲप सध्या केवळ अँड्रॉइड फोनवरच उपलब्ध आहे. मतदारांनी हे ॲप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून ते त्यांच्या मतदार यादीतील नोंदणीकृत फोन नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे. सी-डॅक या संस्थेने हे ॲप विकसित केले असून दुसरे एक ॲप राज्य निवडणूक आयोगानेही तयार
केले आहे.


असे करता येईल ई-मतदान : ई-मतदानासाठी फक्त


दोन नोंदणीकृत मतदार एका फोन नंबरवरून लॉगिन करू शकतात. प्रत्येक मतदाराचे ओळखपत्र तपासून मतदानाची वैधता
निश्चित केली जाईल. ज्यांच्याकडे मोबाईल नाही, त्यांनाही राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून मतदानाची सुविधा उपलब्ध आहे.



सुरक्षेसाठी केलेले उपाय



  • मतांचा मागोवा ठेवण्यासाठी व्हीव्हीपॅटसारखी सुविधा उपलब्ध होते.

  • मतदान करण्यापूर्वी चेहरा स्कॅनिंग आणि मतदार ओळखपत्राशी जुळवणी केली जाईल.

  • संपूर्ण मतदान प्रक्रिया ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे सुरक्षित आणि हॅक-प्रूफ बनवली गेली आहे.

  • बिहारमध्ये ई-वोटिंगसाठी नोंदणी कशी करावी?

  • अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर आपला मोबाईल क्रमांक

  • टाका आणि तो मतदार यादीशी लिंक करा.

  • मोबाईल क्रमांक सत्यापित झाल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.

  • याशिवाय मतदानाच्या दिवशी तुम्ही अ‍ॅप किंवा राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटद्वारे मतदान करू शकता.


फसवणूक टाळण्यासाठी उपाय :




  • मतांचे रेकॉर्डिंग सुरक्षित ठेवता येते, त्यात बदल करता येत नाही.

  • प्रत्येक मताची मतदार ओळखपत्राशी पडताळणी केली जाते.

  • ई-मतदानासाठी नोंदणी प्रक्रिया


ई-वोटिंग प्रणालीची वैशिष्ट्ये
ही नवीन ई-वोटिंग प्रणाली ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि चेहरा ओळख यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे, जी मतदान प्रक्रियेला पारदर्शी आणि सुरक्षित बनवते. ही सुविधा प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, गर्भवती महिला आणि स्थलांतरित मतदार जे मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाहीत, यांच्यासाठी आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे