जमिनीच्या वादातून महिला किर्तनकाराची दगडाने ठेचून हत्या ?

  72

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारातील आश्रमात राहणाऱ्या महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीता पवार यांची शुक्रवारी रात्री दगडाने ठेचून हत्या झाली. मोहटादेवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले. त्यावेळी आश्रमाचे कुलूप गेट तोडलेले दिसले. त्यांनी आत जाऊन बघितले त्यावेळी संगीता पवार रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी हत्येप्रकरणी तपास सुरू केला आहे.

आश्रम बांधण्यासाठी वाळू आणली असता शेजारच्या कुटुंबाने वाद घालत शिवीगाळ केली होती; असे संगीताच्या वडिलांनी, अण्णासाहेब पवार यांनी पोलिसांना सांगितले. त्यांनी वादातून संगीताची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला.

चिंचडगावमध्ये २००७ मध्ये दीड एकर जमीन घेतली. तेव्हापासून शेजारचं कुटुंब आमच्याशी वाद घालत होते. त्यानंतर ही जमीन मी मुलगी संगीता हिला दिली. संगीता या जमिनीवर आश्रम बांधणार होती. त्यासाठी जमिनीवर वाळू आणण्यात आली. यावेळी शेजारील कुटुंबाने वाद घातला. चौदा एप्रिल रोजी विरगाव पोलीस ठाण्यात शेजारच्या चौधरी कुटुंबाच्या विरोधात तक्रार दिली. माझ्या मुलीच्या जीवाला धोका असल्याचा देखील उल्लेख केला होता. त्यानंतर माझ्या मुलीची हत्या झाल्याचे वडील अण्णासाहेब पवार म्हणाले. अण्णासाहेब पवारांनी दिलेली माहिती आणि व्यक्त केलेला संशय याआधी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू आहे.

 
Comments
Add Comment

मतदार यादीतून माझे नाव गायब होऊ शकते तर..., तेजस्वी यादवच्या या आरोपावर निवडणूक आयोगाचे आले स्पष्टीकरण

पाटणा : बिहारच्या मतदार यादीतून तेजस्वी यादव यांचे नाव वगळण्यात आलेले नाही. पाटणा जिल्हा प्रशासनाने तेजस्वी

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा

Gold Rate Today: सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात त्सुनामी जाणून घ्या आजच्या सोन्याचे दर !

मोहित सोमण: सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात 'त्सुनामी' आली आहे. सध्या सोन्यात प्रामुख्याने बाजारातील अस्थिरतेचा

Prajwal Revanna : मोठी बातमी, माजी पंतप्रधानांच्या नातूला बलात्कार प्रकरणात जन्मठेप!

बेंगळुरू :  माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांचे नातू आणि माजी JD(S) खासदार प्रज्वल रेवण्णा (वय ३४) यांना बलात्कार

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

EPFO: आता ईपीएफओचे पैसै काही मिनिटात काढा !

प्रतिनिधी: आता तुमच्या ईपीएफओ खात्यातून पैसे काढणे खूप सोपे होणार आहे. सगळ्या पूर्वीच्या क्लिष्ट प्रकिया व पैसे