मुंबई बॉम्बस्फोटांच्या गुन्हेगाराचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू

नवी दिल्ली : भारतात दहशत पसरवण्याच्या कटात सहभागी असलेला ISIS चा भारतातील प्रमुख साकिब अब्दुल हमीद नाचन याचा मेंदूत रक्तस्त्राव अर्थात ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे मृत्यू झाला. नाचन जन्मठेपेची शिक्षा भोगत होता आणि दिल्लीच्या तिहार तुरुंगात होता. तब्येत बिघडल्यामुळे त्याला दिल्लीच्या दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले. तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथेच नाचनने अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी तपासणी करुन त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

साकिब नाचनचा शनिवार २८ जून २०२५ रोजी दुपारी बारा वाजून दहा मिनिटांनी मृत्यू झाला. तो २००२-०३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सिमी आणि आयसिस या भारतात बंदी घातलेल्या संघटनांसाठी तो काम करत होता. दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा हात होता.

डिसेंबर २०२३ मध्ये, एनआयएने अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने त्याला महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील पडघा गावातून इतर १५ जणांसह अटक केली. आयएसआयएसच्या निर्देशानुसार तो बॉम्ब तयार करत होता. भारतात दहशतवादी हल्ल्यांसाठी कट रचणे, हल्लेखोरांना आवश्यक ती मदत पुरवणे ही कामं तो करत होता.

साकिब नाचन तरुणांना 'बयात' म्हणजेच आयसिसच्या खलिफाच्या निष्ठेची शपथ घेण्यास भाग पाडून संघटनेत भरती करत होता. पडघाला मुक्त क्षेत्र घोषित करून त्याने तिथे कट्टर (मूलतत्ववादी) विचार पसरवण्याचे काम सुरू केले होते.

साकिब नाचनच्या नेतृत्वात २००२ - ०३ मध्ये मुंबईत विलेपार्ले, मुलुंड आणि मुंबई सेंट्रल येथे बॉम्बस्फोट करण्यात आले. या तीन स्फोटांमुळे मुंबई हादरली होती. बॉम्बस्फोटांत १३ जणांचा मृत्यू झाला होता आणि ११६ पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणात दहा जणांना दोषी ठरवले होते. दोषींपैकी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
Comments
Add Comment

सिंजीन इंटरनॅशनलने ब्रिस्टल मायर्स स्क्विबसोबत संशोधन करार २०३५ पर्यंत वाढवला

मोहित सोमण: सिंजीन इंटरनॅशनलने ब्रिस्टल मायर्स स्क्विबसोबतचे दीर्घकालीन संशोधन सहकार्य २०२५ पर्यंत वाढवले आहे

जागतिक अस्थिरतेत आणखी जोरदार तगादा सेन्सेक्स ४३०.६९ व निफ्टी १३०.७५ अंकांने कोसळला

मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेचा परिपाक म्हणून शेअर बाजारात आज मोठी घसरण होत आहे. सुरूवातीच्या कलात इक्विटी

अंधेरीत सोसायटीवर गोळीबार, आरोपी फरार; गुन्हा दाखल, तपास सुरू

मुंबई : अंधेरीत लोखंडवाला बॅक रोड परिसरात एका सोसायटीच्या दिशेने अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामुळे

मुंबई महापालिकेत ५० माजी नगरसेवकांचे नातेवाईक

यापूर्वी नगरसेवक भूषवलेल्या माजी नगरसेवकांचे निवडून आलेले नातेवाईक सचिन धानजी मुंबई : मुंबई महापालिकेच्या

मुंबई महापालिकेत गटनेतेपदावर कुणाची लागणार वर्णी

कोणत्या पक्षात कोण आहेत यासाठी दावेदार मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडून नगरसेवक निवडून

टीईटी सक्तीतून जुन्या शिक्षकांना मिळणार मुक्ती?

न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारच्या हालचालींना वेग पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) सक्तीमुळे देशभरातील