बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी - एनडी स्टुडिओ मार्फत साकारणार कलाप्रकल्प, मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत शुभारंभ...

  46

मुंबई : महाराष्ट्राची दादासाहेब फाळके चित्रनगरी (Maharashtra Dadasaheb Phalke Cinema) बेळगाव येथील "बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये (Belgaum Smart City) नवीन कला प्रकल्प साकारत असून आज या कामांचा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पुन्हा शुभारंभ करण्यात आला.कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून आणि एन. डी. स्टुडिओच्या माध्यमातून बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पात सुमारे साडेतीन एकर मध्ये हा कलाप्रकल्प साकारण्यात येत होता. पण तांत्रिक कारणामुळे काही वर्षे या प्रकल्पाचे काम रखडले व नंतर नितीन देसाई यांचे दुर्दैवाने निधन झाले. त्यानंतर फायनान्स कंपनीकडे असलेलात्यांचा एन. डि. स्टुडिओ (N. D. Studio) महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतला असून त्याअंतर्गत बेळगाव स्मार्ट सिटीच्या उभारणीचे काम एनडी स्टुडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या चित्रनगरीकडे आले.


या साडेतीन एकरामध्ये होणाऱ्या कला प्रकल्पात भारतातील पाच विविध प्रांतातील खेडी, हवाई दालन , कलाप्रदर्शन असा वैविध्यपूर्ण हा प्रकल्प आहे. संस्कृती व आधुनिकता यांचा संगम असलेला प्रकल्प उभारणीचे काम गोरेगाव फिल्म सिटी (Goregaon Film City)  करणार आहे. आज पुन्हा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत कामांचा औपचारिक शुभारंभ करुन प्रकल्प उभारणीच्या कामांना सुरुवात करण्यात आली.


यावेळी गोरेगाव चित्रनगरीचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, वित्तीय सल्लागार मुख्य वित्तलेखा अधिकारी चित्रलेखा खातू,सहायक लेखा अधिकारी महेश भांगरे, त्याचबरोबर व्यवस्थापकीय संचालिका बेळगाव स्मार्ट सिटी , श्रीम. सयीद अफरीन उपस्थित होते. प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील तसेच अतिरिक्त मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य, श्री. विकास खारगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. स्थानिक आमदार अभय पाटील यांनी प्रकल्पासाठी समन्वय साधून प्रकल्प मार्गी लागावा म्हणून पाठपुरावा केला. याप्रसंगी काही स्थानिक लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते.

Comments
Add Comment

बँकॉकहून मुंबईला येणारे विमान लँडिंगदरम्यान आदळले! थोडक्यात टळला अपघात

मुंबई: आज मुंबई विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला आहे, बँकॉकवरुण येणारे हे

पापाची हंडी आम्ही फोडली, लोणी कुणी खाल्लं? मुंबईच्या दहीहंडी उत्सवातून फडणवीसांनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

मुंबई: राजधानी मुंबईसह उपनगरांमध्ये दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्सवाला राजकीय रंगाचीही

बीएमसीच्या ‘पार्किंग’साठी ‘वृक्षतोड’

मुंबई : आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनजवळ आठ झाडे तोडण्याच्या आणि चार इतर झाडांचे स्थलांतर करण्याच्या 'बृहन्मुंबई

गर्भवती बांगलादेशी महिला जेजे रुग्णालयातून फरार, पोलिसांचा शोध सुरू

मुंबई: भारतात बेकायदेशीर वास्तव्यासाठी नवी मुंबई येथून एका २१ वर्षीय बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली होती.

घाटकोपर येथील दहीहंडीद्वारे 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये सहभागी सैनिकांच्या शौर्याला सलाम- देवेंद्र फडणवीस

मुंबई: आज मुंबईत सर्वत्र दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला. यादरम्यान जय जवान आणि कोकणनगर दहीहंडी पथकाने दहा थर

‘दहीहंडी’द्वारे गोविंदा पथकांचा भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला सलाम

मुंबई शहर व उपनगरातील विविध दहीहंडी उत्सव कार्यक्रमांना मुख्यमंत्र्यांची उपस्थिती मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’