खोडाळा हायस्कूलचे पत्रे पावसाळ्यातही गायब !

  46

मोखाडा : खोडाळा येथे पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळ संस्थेची अनुदानित शाळा आहे. या शाळेत खोडाळा आणि परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच चांगल्या सुखसोयी भौतिक सुविधा देणे शाळा व्यवस्थापनाचे काम आहे. मात्र अतिशय पडकी इमारत असल्याने स्पार्क फाऊंडेशन या संस्थेने मदतीचा हात देत दोन वर्षांपूर्वी या वर्ग खोल्या दुरुस्त्या करून रंगरंगोटी करून खोल्या सुंदर केल्या होत्या; परंतु मे महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यात या हायस्कुलचे पत्र्याचे छप्पर उडून गेले आहे. तसेच १६ मे रोजी उडालेले छत महिना होऊन ही दुरुस्ती न केल्याने ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांची मात्र बसायची अडचण झालेली असून शिक्षण घ्यायचे कसे असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे शाळेवर छत बसवण्याची जबाबदारी कोणाची हा खरा सवाल आहे.

खोडाळा हायस्कूल येथे १० वी पर्यंतचे वर्ग असून परीक्षा केंद्र सुद्धा याठिकाणी आहे. गोर गरीबांना शिक्षण मिळावे, आपली मुल स्थानिक पातळीवर शिकावी यासाठी तब्बल ५० वर्षांपर्वी हे हायस्कूल याठिकाणी सुरू करण्यात आले तिथून ग्रामस्थ व्यवस्थापन समिती यांच्या प्रयत्नाने वर्ग खोल्या, हॉल अशा भौतिक सुविधा पुरवण्यासाठी खोडाळा ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करीत ही शाळा उभारली. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आता ग्रामस्थ आणि स्कूल कमिटी कडून करण्यात येत आहे. कारण दीड महिना होऊनही हे उडालेले पत्रे शाळेवर टाकण्यास संस्था चालक अनुत्सुक असल्याचे दिसून येत असल्याने आम्ही शिक्षण देतो म्हणजे जनुकाही उपकार करतो अशा प्रकारचे दुर्लक्ष या शाळेकडे करीत आहेत.

"आम्ही या बाबत स्थानिक स्कूल कमिटीची बैठका बोलावली होती. यामध्ये शाळा संस्थेचा प्रतिनिधींना सुद्धा बोलावण्यात आले होते; परंतु संस्था फक्त ५० हजार द्यायला तयार असून बाकी ग्रामस्थांनी मदत करावी अशी भूमिका मांडत यामुळे नेहमीच ग्रामस्थांनी किती मदत करायची, संस्थेची काही जबाबदारी आहे की नाही हा आमचा प्रश्न आहे." - प्रल्हाद कदम, चेअरमन स्कूल कमिटी खोडाळा हायस्कूल.

Comments
Add Comment

लिपी आधी मरते, मग भाषा: दीपक पवार

वसई : "भाषा नंतर मरते, पण लिपी आधी मरते. तिच्या नियमित वापराची आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. माणसं, झाडं

वसई-विरारची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

भाजपच्या ५ मंडळ अध्यक्षांना पदोन्नती विरार : भारतीय जनता पक्षाचा संघटनात्मक जिल्हा असलेल्या वसई-विरारची जिल्हा

...अखेर वाड्यातील रस्त्याची खड्डे भरून दुरुस्ती सुरू

निंबवली मार्गावरील नागरिकांनी मानले आभार अनंता दुबेले कुडूस : वाडा तालुक्यातील निंबवली - पालसई हा रस्ता अत्यंत

‘उडता वसई-विरार’ रोखण्यासाठी जनजागृती अभियान

कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त विरार : मीरा भाईंदर- वसई विरार पोलिस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या नालासोपारा,

विरार–डहाणू चौपदरीकरणाचा वेग कासवगतीने

पालघर : विरार ते डहाणू रोडदरम्यानच्या पश्चिम रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण काम अपेक्षेपेक्षा खूपच संथ गतीने सुरू

मोखाडा नगरपंचायत रिक्त पदे; कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भार

‘कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे’ मोखाडा : मोखाडा नगरपंचायत ही आता रिक्त पदांची पंचायत झाल्याचे चित्र दिसत आहे.