Jagannath Yatra Stampede: जगन्नाथ यात्रेला गालबोट! चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू, अनेकजण जण जखमी

पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ भीषण चेंगराचेंगरी


ओडिशा: पुरी जिल्ह्यातील भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान रविवारी सकाळी श्री गुंडीचा मंदिराजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत किमान तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि सुमारे १० जण जखमी झाले. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास श्री गुंडीचा मंदिरासमोर रथावर विराजमान भगवान जगन्नाथ यांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. यादरम्यान, धक्काबुक्की झाली आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.


पुरीचे जिल्हाधिकारी सिद्धार्थ एस स्वैन यांनी सांगितले की, या घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बसंती साहू, प्रेमकांत मोहंती आणि प्रवती दास अशी मृतांची नावे आहेत. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. आणि प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि जखमींना मदत करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.


दरम्यान, शुक्रवारी पुरी येथे महाप्रभू जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान काही लोकांनी गुदमरल्याची तक्रार केली आणि आर्द्रतेमुळे अनेक जण बेशुद्ध पडले होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी रथयात्रेदरम्यान प्रचंड उष्णतेमुळे आणि प्रचंड गर्दीमुळे सुमारे ६२५ लोक आजारी पडले. अनेक भाविकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक लोकांना उलट्या, चक्कर येणे आणि किरकोळ दुखापती झाल्या.


पुरीचे मुख्य जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सत्पथी म्हणाले की, बहुतेक रुग्णांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्यांनी सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन