आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली : आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहे . हे नियम कसोटी, एकदिवसीय आणि टी २० क्रिकेटसाठी आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपलाही हे नियम लागू होणार आहेत.

कोणते आहेत हे नियम ?


कॅच रिव्यूमध्ये एलीबीडब्ल्यू

आयसीसीनं कॅचच्या नियमांमध्ये देखील बदल केले आहेत. जर कॅच आऊटच्या रिव्यूमध्ये तो चुकीचा ठरल्यास आणि बॉल पॅडवर लागल्यास टीव्ही अम्पायर एलीबीडब्ल्यू फलंदाज आऊट आहे का ते पाहतील. हा नियम कसोटी, टी २० आणि वनडे मध्ये लागू असेल.

शॉर्ट रन काढल्यास दंड

आयसीसीनं कसोटी, वनडे आणि टी २० क्रिकेटमधील शॉर्ट रनचा नियम बदलला आहे. जाणीवपूर्वक शॉर्ट रन घेतल्यास पहिल्यांदा ५ धावांचा दंड लावला जायचा. आता फलंदाजानं अतिरिक्त रन घेण्यासाठी जाणीवपूर्वक पहिली रन पूर्ण न केल्यास फील्डिंग करणाऱ्या संघाला स्ट्राइकवर कोणता खेळाडू पाहिजे असं विचारतील, आणि त्यांनी सांगितलेल्या खेळाडुला स्ट्राइकवर घेतले जाईल . ५ धावांचा नियम देखील लागू असेल , त्यात बदल नाही .

चुकून चेंडूला लाळ लावली म्हणून चेंडू बदलता येणार नाही

एखाद्या गोलंदाजानं चुकून चेंडूला लाळ लावली म्हणून चेंडू बदलता येणार नाही. चुकून लाळ लावल्यास चेंडू बदलणे अनिवार्य नसेल. चेंडूच्या रचनेत बदल झाल्यास किंवा चेंडू खूप ओला झाल्यानं त्याच्यावरील चमक वाढल्यास अम्पायर चेंडू बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात. चेंडू बदलण्याचा निर्णय घेणं हे पंचांवर अवलंबून असेल. चेंडूत फार बदल झाला नसेल तर तर तो बदलला जाणार नाही. हे नियम कसोटी, वनडे आणि टी २० क्रिकेटसाठी लागू असतील .

कसोटी क्रिकेटमध्ये स्टॉप वॉच

आयसीसीनं कसोटी क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमानुसार कसोटी क्रिकेटमध्ये फील्डिंग करणाऱ्या टीमनं ६० सेकंदापेक्षा जास्त वेळ ओव्हर सुरु करण्यास लावल्यास पहिल्यांदा दोन वेळा वॉर्निंग दिली जाईल . त्यानंतर नियमाचे पालन न केल्यास त्या संघाच्या ५ धावा वजा केल्या जाणार आहेत. टी २० क्रिकेट आणि वनडे क्रिकेटमध्ये हा नियम एक वर्षापासून लागू आहे.

नोबॉलवर कॅच

पंचांनी सॉफ्ट सिग्नल रिव्यू घेतल्यास आणि नो बॉलवर कॅच योग्य असल्यास फलंदाजी करणाऱ्या टीमला नो बॉलची एक रन अतिरिक्त मिळेल. कॅच योग्य नसल्यास नो बॉलची एक रन आणि फलंदाज जितक्या रन धावतील त्यांना त्या धावा मिळतील.

पहिल्यांदा कॅचसंदर्भात संशय असल्यास मैदानावरील पंच थंर्ड अम्पायरकडे दाद मागायचे. त्यावेळी टीव्ही अम्पायर नो बॉल होता की नव्हता हे सांगायचे, कॅचची तपासणी करत नव्हते. आता त्याची तपासणी केली जाईल. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये हा नियम लागू असेल.

टी २० पॉवर प्लेचे नियम बदलले

आयसीसीनं टी २० क्रिकेटमधील पॉवरप्लेच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. हे नियम जुलैपासून लागू होणार आहेत. पाऊस किंवा अन्य कारणांमुळं मॅचमधील ओव्हर कमी केल्यास पॉवरप्लेच्या ओव्हर देखील कमी केल्या जाणार आहे.

ओव्हर आणि पॉवरप्ले

५ ओव्हरची मॅच : १.३ ओव्हरचा पॉवरप्ले
६ ओव्हरची मॅच : १.५ ओव्हरचा पॉवरप्ले
७ ओव्हरची मॅच : २.१ ओव्हरचा पॉवरप्ले
८ ओव्हरची मॅच : २.२ ओव्हरचा पॉवरप्ले
९ ओव्हरची मॅच : २.४ ओव्हरचा पॉवरप्ले
१० ओव्हरची मॅच : ३ ओव्हरचा पॉवरप्ले
११ ओव्हरची मॅच : ३.२ ओव्हरचा पॉवरप्ले
१२ ओव्हरची मॅच : ३.४ ओव्हरचा पॉवरप्ले
१३ ओव्हरची मॅच : ३.५ ओव्हरचा पॉवरप्ले
१४ ओव्हरची मॅच : ४.१ ओव्हरचा पॉवरप्ले
१५ ओव्हरची मॅच : ४.३ ओव्हरचा पॉवरप्ले
१६ ओव्हरची मॅच : ४.५ ओव्हरचा पॉवरप्ले
१७ ओव्हरची मॅच : ५.१ ओव्हरचा पॉवरप्ले
१८ ओव्हरची मॅच : ५.२ ओव्हरचा पॉवरप्ले
१९ ओव्हरची मॅच : ५.४ ओव्हरचा पॉवरप्ले
Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या