रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन प्रक्रियेत सुधारणा करण्याच्या दिशेने पावले उचलण्यासाठी भारतीय रेल्वे सातत्याने नवनवीन उपक्रम करत आहे. १ जुलैपासून आता तत्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलणार आहेत. आता रेल्वे मंडळाने या प्रपोजलवर सहमती दर्शवली आहे. यात रेल्वे सुटण्याच्या ८ तास आधी रिझर्व्हेशन चार्ट तयार होणार आहे.

टप्प्याटप्प्याने लागू होणार नियम


रेल्वे बोर्डाने प्रवाशांसाठी रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी आरक्षण चार्ट तयार करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. यावर सहमती दर्शवताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. रेल्वे मंत्रीने प्रपोजला टप्प्याटप्प्याने लागू करण्यासाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. ही बातमी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एखाद्या गिफ्टपेक्षा कमी नाही.

शेवटच्या क्षणापर्यंतची प्रतीक्षा संपली


रेल्वेच्या या निर्णयामुळे आता आपली तिकीट कन्फर्म झाली की नाही याची माहिती आधीच मिळणार आहे. त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत याची वाट बघायला नको. आठ तास आधीच कन्फर्मेशन मिळाल्याने प्रवाशांना प्रवासही सुलभ होणार आहे.

१ जुलैपासून रेल्वे करत आहेत हे बदल


रेल्वे प्रवाशांच्या सविधेसाठी भारतीय रेल्वे सातत्याने पावले उचलत आहे. याच अंतर्गत १ जुलै २०२५पासून मोठा बदल होत आहे. यात पहिल्या तारखेपासून आता केवळ आधार व्हेरिफाईड युजर्सच आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून तत्काळ तिकीट बुक करू शकतात.
Comments
Add Comment

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान

देशभरात पुढील आठवड्यापासून मतदार याद्यांची सखोल छाननी

पुढील वर्षी पश्चिम बंगालसह ५ राज्यांत निवडणुका निवडणूक आयोग पुढील आठवड्यात देशभरातील मतदार याद्यांचे विशेष

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या