पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात सुधारणा झाली. त्यामुळे मुंबईकरांची  पाण्याच्या  बाबतीत चिंता मिटली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी धरणात जास्त प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणी संकट टळलं आहे.  मागील वर्षात धरणात ५.३५ टक्के पाणीसाठा असल्याने मुंबईकरांची चिंता वाढली होती. मुंबईच्या धरणात उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून प्रतिदिन ३९०० दशलक्ष पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे या वर्षी मुंबईच्या धरणात ३८.५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.


मुंबईकरांना उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून प्रतिदिन ३९०० दशलक्ष पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने या सातही धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र गेल्या काही महिन्यांपासून धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठायला सुरुवात केली होती. कडक उन्हाळ्यामुळे झपाट्याने होणाऱ्या बाष्पीभवनामुळे धरणांमधील पाणीसाठा खालावू लागला होता.


यंदा मे महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे सातही धरणांतील जलसाठ्यात वाढ होऊ लागली होती. आतापर्यंत सातही धरणांमध्ये ३८.५८ टक्के पाच लाख ५८ हजार ३५० दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध झाला होता.गतवर्षी याच दिवशी या धरणांतील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक होती. त्यावेळी केवळ ५.३५ टक्के म्हणजे ७७ हजार ४२१ दशलक्ष लिटर इतके पाणी धरणांमध्ये होते. तर तत्पूर्वी २८ जून २०२३ रोजी धरणांमध्ये एक लाख पाच हजार १०८ दशलक्ष लिटर (७.२६ टक्के) पाणी उपलब्ध होते. मागील दोन वर्षांच्या तुलनेत धरणांतील साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात पावसाचा जोर वाढला तर धरणातला पाणीसाठा जास्त वाढू शकतो. त्यामुळे मुंबईकरांनावरील पाण्याचं संकट पूर्णपणे टळलं आहे.













Comments
Add Comment

देशामध्ये २२ बनावट विद्यापीठे

‘यूजीसी’ने जाहीर केली यादी मुंबई  : मान्यता नसलेल्या विद्यापीठांमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व

आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण अटळ

मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी करावी. सर्व रिक्त पदांवर

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता