रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक

  78

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेचा रविवार २९ जून २०२५ रोजी मेगाब्लॉक आहे. ब्लॉक काळात उपनगरीय रेल्वे सेवेच्या वेळापत्रकात बदल केला जाणार आहे. अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्यांच्या मार्गात फेरबदल करण्यात आले आहेत. गाड्या नियोजीत वेळेच्या तुलनेत काही मिनिटे उशिराने धावतील. यामुळे प्रवाशांनी मेगाब्लॉक काळातील वेळापत्रकाची माहिती घेऊन नंतर प्रवासाचे नियजन करणे हिताचे आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी मध्यरात्रीच वसई रोड ते वैतरणादरम्यान देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक नसेल.

मध्य रेल्वे, मुख्य मार्ग - ठाणे ते कल्याण जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावर - सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० मेगाब्लॉक
ब्लॉक काळात ठाणे ते कल्याण जाणाऱ्या आणि येणाऱ्या जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या जातील. काही गाड्या २० मिनिटे उशिराने धावतील.

हार्बर रेल्वे मार्ग - पनवेल ते वाशी - जाणाऱ्या आणि येणाऱ्या मार्गावर - सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ४.०५ मेगाब्लॉक - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूरदरम्यान, ठाणे ते पनवेलदरम्यान जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावणार आहेत. ठाणे ते वाशी/नेरूळदरम्यान आणि खारकोपर मार्गावर लोकल फेऱ्या सुरू राहणार आहेत. ब्लॉक वेळेत हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
Comments
Add Comment

गणेशोत्सवासाठी रात्रभर रस्त्यावर धावणार बेस्ट बसेस

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी सुविधा मुंबई : मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र

महाराष्ट्रातील १ कोटी बहीणींना लखपती दीदी करणार

मुंबई : लखपती दीदींसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर

येत्या ०४ सप्टेंबरपर्यंत नागरिकांना नोंदवता येणार हरकती, सूचना मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक

माजी बँक अध्यक्ष 'फरार' घोषित!

मुंबई: १२२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार घोटाळ्याप्रकरणी एस्प्लेनेड न्यायालयाने 'न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह