शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

  53

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात झाला आहे . आधी खून आणि नंतर आत्महत्येच्या घटनेने गावात खळबळ उडाली आहे .



गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतीच्या वादाने काल नवीनच वळण घेतले. वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात मोहिजे कुटुंबात शेतीच्या वाटपावरून वाद सुरू होते . हा वाद इतका चिघळला की आरोपी महेंद्र मोहिजे याने त्याची चुलती साधना सुभाष मोहिजे (वय ५५) आणि त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे (वय २७) यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले . त्यात या दोघांचाही मृत्यू झाला . त्यानंतर घाबरलेल्या आरोपी महेंद्र मोहिजेने देखील विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली . या घटनेनंतर अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल चौहान यांनी घटनास्थळाची पाहणी केली . यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वर्धा जिल्हा रुग्णालयात पाठवले गेले .


पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र मोहिजे हा साधना मोहिजे यांचा पुतण्या होता, तर नितीन मोहिजे त्याचा चुलत भाऊ होता . शेतीच्या मालकीहक्कावरून आणि मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वाटपावरून अनेक दिवसांपासून हे वाद सुरू होते. त्या वादातून महेंद्र मोहिजेने हे पाऊल उचलले . घटनास्थळी हजर असलेल्या आणि शेजारी राहणाऱ्या लोकांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत . अधिक तपास अल्लीपूर पोलीस करत आहेत .

Comments
Add Comment

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या