नागोठणे, वरवठणे पूल वाहतुकीसाठी बंद

अलिबाग : नागोठणे येथील मोघलकालीन पूल अरुंद व कमकुवत झाल्यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सदर पुलावरील वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णतः बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत.


या संदर्भात महाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला होता. पुलाच्या दोन्ही बाजूस बॅरिकेड्स आणि सूचना फलकही लावण्यात आले आहेत.


सदर रस्त्यावर वाहतूक बंद करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांसाठी वरवठणे–आंबेघर फाटा–रिलायन्स चौक–नागोठणे हा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक रायगड यांच्याकडूनही यासंदर्भात सकारात्मक अहवाल प्राप्त झाला असून पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरळीतपणे चालू ठेवता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)

सिडको-नैना क्षेत्रातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन

पनवेल तालुक्यातील ४६ गावांचा प्रश्न मार्गी लागणार पनवेल : पनवेल तालुक्यामधील सिडको व नैना अधिसूचित क्षेत्रातील

कर्जतमध्ये सुधाकर घारे यांचे जोरदार कमबॅक

नितीन सावंतांना सोबत घेऊन थोरवे आणि लाड यांना धक्का कर्जत : येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत परिवर्तन विकास

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अबाधित

विकासकामांना ग्रामस्थांनी निवडले रुपेंद्र मळेकर रोहा : रोहा नगरपरिषद निवडणुकीत मोठ्या चुरशीच्या झालेल्या

उबाठाशी युती राष्ट्रवादीच्या फळाला आली

मुरुडकरांनी जुन्यांना नाकारले तरुणांकडे धुरा! उदय खोत नांदगाव मुरुड : मुरुड नगरपरिषदेची निवडणूक

आपली पोरं सांभाळू शकले नाहीत, ते मुंबई काय सांभाळणार?

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली