Mazgaon Dock: प्रथमच आंतरराष्ट्रीय डॉक अधिग्रहणात भारताचा वरचष्मा! माझगाव डॉककडून कोलंबो डॉकयार्डचे अधिग्रहण होणार !

प्रतिनिधी: माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) कंपनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कंपनीने नुकतेच श्रीलंकेच्या ' कोलंबो डॉकयार्ड पीएलसी (Colambo Dockyard PLC) कंपनीचे अधिग्रहण करणार असल्याचे माझगाव डॉकने रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटले आहे. त्यामुळे कंपनी लवकरच कोलंबो डॉकयार्ड कंपनीचे अधिग्रहण करेल. कंपनीच्या इतिहासातील हा एक मोठा निर्णय मानला जात आहे. कारण कंपनीने प्रथमच आंतरराष्ट्रीय मेरीटाईम प्लेअर (International Maritime Player) म्हणून श्रीलंकन कंपनीची खरेदी करणार आहे.  ही ५० वर्ष जुनी शिपयार्ड कंपनी आहे जी प्रामुख्याने जहाज बांधणी, दुरूस्ती, मरिन इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत आहे.


यामुळे श्रीलंकेत जहाजबांधणी अथवा शिपिंग व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन मूलभूत बदल होणे अपेक्षित आहेत असे माझगाव डॉक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स या अधिग्रहणानंतर ३ नव्या सबमरिन बांधण्याचे नवे कंत्राट घेऊ शकतात. रिपोर्टनुसार, या सबमरिन सौद्यांची किंमत ३८००० कोटींची असणार आहे. कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार, ' हा एक महत्वाचा सागरी मार्ग असून कोलंबो बंदरस्थित कोलंबो डॉकयार्ड पीएलसीला हिंद महासागर प्रदेशात एक धोरणात्मक पायाभूत सुविधा (Infrastructure) देते.' याखेरीज माझगाव डॉक सीडीपीएलसी (Colombo Dockyard PLC) करिता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील दुरुस्ती, पुनर्बाधणी, व नव्या बांधणीसाठी ऑर्डर आणेल.' असे माझगाव डॉकने म्हटले आहे.


कंपनीने हे केलेलं प्रथम आंतरराष्ट्रीय अधिग्रहण असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय सुरक्षेचीही किनार आहे. चीनने श्रीलंकेला संरचनात्मक दृष्ट्या जोडण्यासाठी या इंडियन ओशन रिजन (IOR) मध्ये हालचाली केल्या होत्या. भारताने दुरदृष्टीने विचार करत हे धोरणात्मक पाऊल उचलले आहे. चीनने मोठ्या प्रमाणात श्रीलंकेशी लॉजिस्टिकस (Logisitics) दृष्टीने मोठ्या व्यापारी हालचाली सुरू केल्या आहेत या भागात भारताची हजेरी दर्शविण्यासाठी हा प्रकल्प सुरु केला असल्याची चर्चा आहे. माहितीनुसार, ५३ लक्ष डॉलरची ही गुंतवणूक अधिग्रहणात होणार आहे. सध्या श्रीलंकन डॉकयार्डमध्ये सर्वाधिक भागभांडवल Onomichi Dockyard Co Limited कंपनीचे बहुतांश भागभांडवल आहे. त्यांच्याकडे असलेल्या भागभांडवला व्यतिरिक्त इतर हिस्सा माझगाव डॉककडून खरेदी केला जाऊ शकतो.


' ५२.९६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंतची ही गुंतवणूक प्राथमिक गुंतवणूक आणि दुय्यम शेअर खरेदीच्या संयोजनाद्वारे केली जाईल, ज्यामध्ये सध्याचा बहुसंख्य शेअरहोल्डर असलेल्या ओनोमिची डॉकयार्ड कंपनी लिमिटेडकडून शेअर्सचे अधिग्रहण समाविष्ट आहे.' असे वृत्त काल वृत्तसंस्थेने दिले होते. काल २७ जूनला एमडीएल,कोलंबो डॉकयार्ड आणि जपानच्या ओनोमिची डॉकयार्ड यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय करारानंतर हे अधिग्रहण करण्यात आले आहे, ज्याअंतर्गत एमडीएल कोलंबो डॉकयार्डमधील ओनोमिचीचा नियंत्रण हिस्सा ताब्यात घेतला जाणार आहे.


‘राष्ट्राचे जहाज’ म्हणून ओळखले जाणारे मुंबईस्थित एमडीएल भारताच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते आणि युद्धनौका, पाणबुड्या आणि व्यापारी जहाजांचे एक आघाडीचे निर्माते आहे. कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध देखील आहे. श्रीलंकेच्या सरकारने भारत सरकारला कोलंबो डॉकयार्डमध्ये भारतीय गुंतवणूकदारांना आमंत्रित करण्याची विनंती केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे, जे डिफॉल्टच्या उंबरठ्यावर होते. CDPLC कंपनीला आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने भारताने हे निमंत्रण स्विकारत ही नवीन गुंतवणूक केली आहे. माझगाव डॉकचे बाजार भांडवल (Market Capitalisation) हे जवळपास १५.१२ अब्ज डॉलर्सचा घरात आहे.

Comments
Add Comment

TCS Q2 Results: जागतिक अस्थिरतेही Tata Consultancy Services आर्थिक निकाल सकारात्मक कंपनीच्या एकत्रित नफ्यात 'इतक्याने' वाढ

प्रतिनिधी:देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टीसीएसने (Tata Consultancy Services Limited) आपला आर्थिक वर्ष २०२६ दुसरा तिमाही निकाल जाहीर

RBI : RBIचा जबर धक्का! 'या' मोठ्या बँकेचा परवाना रद्द, ठेवीदारांना फटका!

सातारा : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बँकिंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्या

Stock Market Marathi News: मेटल, फार्मा, आयटी, हेल्थकेअर शेअरसह मिडकॅप व लार्जकॅप शेअर्समध्ये उसळी 'या' कारणामुळे सेन्सेक्स ३९८.४४ व निफ्टी १३५.६५ अंकाने उसळला!

मोहित सोमण: मिडकॅप व लार्जकॅपमध्ये झालेल्या रॅलीमुळे आज शेअर बाजारात वाढ झाली आहे. विशेषतः मेटल, फार्मा, आयटी,

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना धक्का! ‘ती’ अट ठरतेय अडचणीची; दिवाळीत पैसे मिळणार की नाही?

मुंबई : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थ्यांसाठी आता एक मोठी अडचण निर्माण

GST benefits on Classic Legend Java Yezd Bike: जावा, येझदी मोटारसायककडून जीएसटी दर कपात फायदा ग्राहकांकडे पास

क्लासिक लेजेंड्स कंपनीने देशभरातील ४५० हून अधिक केंद्रांवर विक्री आणि सेवांचा केला विस्तार प्रतिनिधी:जवळजवळ

Tata Breaking News: टाटा कंज्यूमर प्रोडक्ट उत्पादनावर महाराष्ट्रात वितरकांचा बहिष्कार १३ ऑक्टोबरपासून असहकार सुरू होणार !

प्रतिनिधी:टाटा कंज्यूमर प्रोडक्ट (Tata Consumer Products) कंपनी विरोधात वितरकांनी असहकार चळवळ करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी