मॉडेल, अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन, घरी पोहोचली फॉरेन्सिक टीम

मुंबई : तरुणांमध्ये लोकप्रिय असलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे ती लोकप्रिय झाली होती. शेफालीच्या मृत्यूनंतर थोड्याच वेळात तिच्या घरी फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे. मृत्यूच्या कारणाचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टीम शेफालीच्या घरातून नमुन्यांचे (सँपल्स) संकलन करत आहे. बॉलिवूड फोटोग्राफर विरल भैयानीने सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडीओ शेअर करुन ही माहिती दिली आहे.



शेफाली जरीवाल तरुणांमध्ये खूप लोकप्रिय होती. तिचा जन्म अहमदाबादमध्ये झाला. तिला एका गाण्याने रातोरात लोकप्रिय केले. आशा पारेख यांच्या 'कांता लगा' या चित्रपटातील गाण्याचा म्युझिक व्हिडिओ २००२ मध्ये तिने रिक्रिएट केला. हे गाणे 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटात वापरले होते. युट्यूबवर त्याला सुमारे १०० दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. जेव्हा हे गाणे आले तेव्हा त्याला खूप लोकप्रियता मिळाली आणि त्याला विरोधही सहन करावा लागला. शेफालीचा हा व्हिडिओ इतका हिट झाला की तिची ओळख 'कांटा लगा गर्ल' अशी झाली. तिने सलमान खानच्या लोकप्रिय शो 'बिग बॉस १३' मध्येही भाग घेतला. तिने तिच्या कारकिर्दीतील एकमेव हिंदी चित्रपट 'मुझसे शादी करोगी' केला. त्याच वेळी ती 'हुडुगारू' नावाच्या कन्नड चित्रपटाचा भाग होती.

अंधेरीच्या लोखंडवाला भागात राहणाऱ्या शेफालीने शुक्रवारी (२७ जून २०२५) रात्री ११ वाजता छातीत दुखत असल्याची तक्रार केली. शेफालीचा पती पराग त्यागी याने तिला जवळच्या रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करताच शेफालीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यानंतर शेफालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला. शेफालीने ३ दिवसांपूर्वी एक फोटोशूट केले होते. नंतर ती घरीच होती. यामुळे शेफालीला नेमके काय झाले याचा तपास सुरू आहे. शेफालीच्या घरी फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे.
Comments
Add Comment

Salman Khan : सलमान खानच्या तब्येतीला काय झालं ? चाहत्यांचं टेन्शन वाढलं!

मुंबई(Mumbai) : बॉलीवूडचा भाई जान म्हणजेच सलमान खान हा त्याच्या फीट बॉडीमुळे नेहमी चर्चेत असायचा. मात्र सध्या सोशल

Ek Hota Maalin Trailer : 'एक होतं माळीण' चित्रपटाचा रंजक ट्रेलर सोशल मीडियावर लाँच

मुंबई (Mumbai): काही वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे भूस्खलन होऊन गाडल्या गेलेल्या माळीण गावाचा थरार आता मोठ्या पडद्यावर

Sourav Ganguly : 'दादा - द सौरव गांगुली स्टोरी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या बहुप्रतिक्षित

ALPHA TEASER : आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणाऱ्या 'या' मराठी अभिनेत्रीची चर्चा!

MUMBAI : यशराज फिल्म्सच्या बहुचर्चित 'स्पाय युनिव्हर्स'मधील आगामी 'अल्फा' (Alpha) चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला

Samarth Panel : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या

CINTAA : रणवीर सिंग-फरहान अख्तर वादावर CINTAA अध्यक्ष पूनम ढिल्लों यांची स्पष्टोक्ती; 'कलाकारांना कामगार म्हणून अधिकृत मान्यता मिळवणे हेच आमचे ध्येय'

NAVI MUMBAI : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील अलीकडील वादाच्या पार्श्वभूमीवर CINTAA च्या अध्यक्षा