Donald Trump Trade: भारताचे शिष्टमंडळ अमेरिकेला 'Trade Deal ' साठी रवाना ! 'या' मुद्यावर तोडगा निघणार?

प्रतिनिधी: नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, भारताचे आर्थिक शिष्टमंडळ अमेरिकेला रवाना झाले आहे. युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक संकेतानंतरही घडणारी ही मोठी घडामोड आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच चीनबरोबर एफटीए (Foreign Trade Agreement FTA) पूर्ण केले होते. त्यामुळे अमेरिका, चीन यांच्यातील बोलणीनंतर महत्वाच्या मुद्यांवर द्वंद्व संपले होते. त्याचवेळी भारताबाबतही त्यांनी भाष्य केले होते ज्यात ते म्हणाले होते, 'भारत व युएस 'कदाचित' व्यापारी डीलवर सह्या करतील.' कदाचित दरवाजे उघडतील ('Open Up') या संकेतानंतर दोन्ही देशांच्या आर्थिक विश्वात सकारात्मक परिणाम झाले आहेत.  ९ जुलैला युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसीप्रोकल टेरिफ हाईक (Reciprocal Tariff Hike) म्हणजेच शुल्कवाढ रोखण्याची अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे भारताचे व अमेरिकेचे शिष्टमंडळ यानिमित्ताने सकारात्मक चर्चा करत शकतात. तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले,' आम्ही भारतासाठी खुले आहोत. चीनशी डिलमध्ये आम्ही चीनशी खुले आहोत.' असे म्हटले होते.

जागतिक बाजारातील अमेरिकेचा व्यापार धोरणावर विचारले असता,'आम्ही सगळ्यांशीच सौदा करणार नाही. काहींनाच त्यांना धन्यवाद देण्यासाठी आम्ही पत्र पाठवू. तुम्हाला २५, ३५, ४५ टक्के दराने पैसे द्यावे लागतील.हा सोपा मार्ग आहे. माझी लोक अशाप्रकारे करणार नाहीत. त्यांना यातील काही डील करायची आहेत मात्र मला जेवढी करायची आहेत त्याहून कमी' अशी प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना व्हाईट हाऊसमध्ये बोलत असताना ट्रम्प यांनी दिली.

सुत्रांच्या माहितीनुसार, अनेक मुद्यांवर भारत युएसमध्ये सहमती आहे. केवळ काही मुद्यांवर विशेषतः काही संवेदनशील क्षेत्रातील व शेतीतील प्रवेशाबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. यापूर्वी अमेरिकेने जगभरात रेसीप्रोकल टेरिफची (Reciprocal Tariff) घोषणा केल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. मात्र विरोधाची पातळी बघता ट्रम्प यांनी काही काळासाठी शुल्कवाढ ९ जुलैपर्यंत पुढे ढकलली होती. भारतीय बाजारातील बाबतीत, अमेरिकेने अनेक अडथळे आणले होते. शुल्केतर अडथळे, तसेच इतर बाबतीत भरमसाठ शुल्कवाढ केल्यानंतरही भारतीय मागण्या युएसने मान्य केलेल्या नाहीत. चीनशी व्यवहार करताना अमेरिकेने याखेरीज शेतकी उत्पादनात खुला प्रवेश (Market Access) वाढवण्याची अटकळ घातली असून सोया, मका उत्पादनासाठी चीनच्या बाजारात परवानगी मिळवली तीच अट भारतापुढे कायम आहे.

भारत तेलाच्या उत्पादनात अग्रेसर आहे तर अमेरिका सोयाबीन उत्पादनात अग्रगण्य आहे. यापूर्वी निती आयोगाने सोयाबीन आयातीवर भारत सवलत देऊ शकते असा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्याच धर्तीवर भारत सोयाबीन आयातीवर व शेतकी उत्पादनावर काय निर्णय घेतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments
Add Comment

IND vs PAK: भारताने धुलाई केल्यानंतर पुन्हा ICCकडे गेला पाकिस्तान, आता ही केली तक्रार

दुबई: आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.

PAK vs SL: आशिया कपमध्ये आज पाकिस्तान-श्रीलंकेसाठी करो वा मरोचा सामना

अबू धाबी: आशिया कप २०२५ च्या सुपर फोरमधील 'करो वा मरो' लढतीत आज पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमनेसामने येत

नवरात्रोत्सव आणि महालक्ष्मी यात्रेकरिता १ ऑक्टोबरपर्यंत बेस्टतर्फे जादा बससेवा

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरातील 'महालक्ष्मी यात्रा' या वर्षी २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे.

नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणाचा मुहूर्त पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वी

Money : आता वर्षाला २.५ लाखांपर्यंत होणार तुमची बचत...

मुंबई : घटस्थापनेच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने आजपासून नवीन जीएसटी दर लागू केले. या महत्वपूर्ण निर्णयामुळे

माथेरानला फिरायला जाण्याचा विचार करताय तर आधी हे वाचा...

रायगड : नेरळ ग्रामपंचायतीने माथेरानकडे येणाऱ्या पर्यटकांकडून ‘स्वच्छता कर’ आकारण्याचा निर्णय घेतला असून,