Central Bank of India : सेंट्रल बँकेने Future Generali India Insurance कंपनीत २४.९१ शेअर्सचे अधिग्रहण केले! बँक म्हणाली....

प्रतिनिधी: सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) या राष्ट्रीयकृत बँकेने (PSU) फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी (Future Generali India Insurance Company (FGIICL) विमा कंपनीत २४.९१% भागभांडवल (Stake) खरेदी केले आहे. बँकेने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. बँकेने म्हटल्याप्रमाणे फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींशी यासंदर्भात चर्चा केली आहे ज्यामध्ये ट्रेडमार्क,भागभांडव लाची कागदपत्रे, इतर कागदी व्यवहारांसबंधी चर्चा झाल्याचे म्हटले आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आपल्या आर्थिक सेवेचा पोर्टफोलिओ विस्तारित करण्यासाठी हे धोरणात्मक पाऊल उचलले आहे. बँकेचा दीर्घ अनुभव व फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनीचे तांत्रिक कौशल्य यांचा एकत्रित यशस्वी प्रयोग करण्यासाठी हे भागभांडवल विकत घेतले गेल्याचे म्हटले जात आहे. बँकेचा मोठा ग्राहक वर्ग, वितरण नेटवर्क, व जनरल कंपनीची विविध आर्थिक उत्पादने यांमुळे भारतीय ग्राहकांची गरज ओळखून तशी उत्पादने वितरित करण्याचे या दोन्ही संस्थांनी ठरवले आहे.

बँकेने जाहीरपत्रकात म्हटल्याप्रमाणे,'या एकत्रिकरणाने (Joint Venture) मुळे आम्ही धोरणात्मक पुढाकार घेतला. यामुळे जीवन व सामान्य विमा (Life and General Insurance) क्षेत्रात बँकेचे अस्तित्व दर्शवेल. भारताच्या आर्थिक नियोजनात व विमा क्षेत्रातील आधुनिक सेवा चालना मिळणार असून विमा सेवेच्या माध्यमातून आर्थिक सशक्तीकरणाला पाठबळ मिळेल जेणेकरून आर्थिक वर्ष २०२४७ पर्यंत 'सगळ्यांना विमा' (Insurance for All) या सरकारच्या धोरणाची पूर्तता करू शकू.'

सेंट्रल बँक ऑफ इंडिया १९११ साली स्थापन झाली असल्याने भारतातील एक सर्वात जुन्या बँकापैकी एक मानली जाते. बँकेच्या देशभरात ४५०० पेक्षा अधिक शाखा आहेत. जनरली इन्शुरन्स कंपनी ही बहुराष्ट्रीय कंपनी (MNC) आहे. त्या कंपनीच्या जगभरातील ५० देशात कार्यालये आहेत. ही कंपनी मुख्यतः आर्थिक सेवा पुरवते ज्यामध्ये विमा, मालमत्ता व्यवस्थापन (Asset Management) अशाप्रकारच्या सुविधा अंतर्भूत आहेत.यातून भारतीय ग्राहकांच्या विम्याच्या गरजा ओळखून त्या पद्धतीने ही आर्थिक उत्पादने डिजाईन केली जाऊ शकतात असा कयास आहे. बँकेने म्हटल्याप्रमाणे, या भागीदारीतून जीवन, सामान्य व आरोग्य विमा पुरवठा केला जाऊ शकतो.

हे संपादन IBBI (कॉर्पोरेट व्यक्तींसाठी दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया) नियमावली २०१६ अंतर्गत करण्यात आले आहे.सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या नियामक फाइलिंगनुसार (Regulatory Filings) अधिग्रहणाची किंमत सामान्य विमा कंपनी (FGIICL) साठी ४५१ कोटी आणि जीवन विमा कंपनी (FGILICL) साठी ५७ कोटी मूल्यांकनाची असेल असे म्हटले आहे. बँकेने या संपादनांसाठी भारतीय स्पर्धा आयोग (CCI), भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) आणि भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ची मान्यता मिळवली आहे.
Comments
Add Comment

IPL 2026 मिनी ऑक्शन परदेशात ? मोठी बातमी समोर आली!

मुंबई : आयपीएल २०२६ हंगामाची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. सर्व संघांनी रणनिती आखायला सुरुवात केली असून, या वेळी

डोक्याला पिस्तुल लावून भाविकांचे नऊ तोळे सोने लुटले

पाथर्डी : गावठी पिस्तूल व चाकूचा धाक दाखवत पाच ते सहा चोरट्यांनी नाशिक येथील भाविकांचे ९ तोळे सोन्याचे दागिने व

निषेध मोर्चा काढल्याबद्दल बाळा नांदगावकर यांच्यासह पाच जणांविरूद्ध गुन्हा

मुंबई : दक्षिण मुंबईत शनिवारी ‘सत्याचा मोर्चा’आयोजित करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्य

आरे, वाकोला व विक्रोळीतल्या उड्डाणपुलांची डागडुजी करणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा.

रील्सस्टारना मालिका आणि चित्रपटांमध्ये संधी देण्याबाबत 'या' मराठी कलाकाराने व्यक्त केली नाराजी

मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहेतच. याच

भरधाव पोलो कार थेट धडकली मेट्रोच्या खांबाला ; पुण्यात दोन तरुणांचा जागीच मृत्यू,

पुणे : बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली भीषण अपघात झाला. काळ्या रंगाच्या पोलो कारने भरधाव वेगात जाताना अचानक