Asian Paints Acquisition: ब्रेकिंग! एशियन पेंटसने White Leak डेकोर कंपनीचे संपूर्ण अधिग्रहण केले

प्रतिनिधी: देशातील सर्वात मोठ्या रंग उत्पादन कंपनीपैकी एक एशियन पेंटस (Asian Paints) कंपनीने लाईटिंग घर सजावट कंपनी (Home Decor) कंपनी व्हाईट टीक (White Teak) कंपनीचे संपूर्ण अधिग्रहण केले आहे. एशियन पेंटस कंपनीने सेबीकडे केलेल्या नियामक फाईलिंगमधील (Regulatory Filings)जाहीर केलेल्या माहितीनुसार व्हाईट टीक कंपनीचे उर्वरित ४०% भागभांडवल (Stake holding) खरेदी केले आहे. कंपनीने फायलिंगमध्ये म्हटल्याप्रमाणे, 'आता असे कळविण्यात येत आहे की कंपनीने आज व्हाईट टीकच्या प्रवर्तकांकडून १८८ कोटी रुपयांच्या मोबदल्यात व्हाईट टीकच्या उर्वरित ४०% इक्विटी शेअर भांडवलाचे अधिग्रहण केले आहे. त्यानुसार, कंपनीकडे आता व्हाईट टीकच्या १००% इक्विटी शेअर भांडवल आहे, ज्यामुळे व्हाईट टीक कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी (Subsidiary) बनली आहे,'

आर्थिक वर्ष २०२५ मधील मार्च तिमाहीत कंपनीच्या Volume Growth यामध्ये १.८% वाढ मिळाली होती. तर जानेवारी मार्च महिन्यात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) कंपनीला ४५% निव्वळ तोटा झाला होता. कंपनीने आपल्या उत्पादन पोर्टफोलिओ (Product Line) वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. रंगांव्यतिरिक्त डेकोर सोल्यूशन, लाईटिंग, इतर उत्पादनात कंपनीला आपले विस्तारिकरण करायचे आहे. यापूर्वी कंपनीने एप्रिल २०२२ मध्ये Obgenix Software Limi ted या कंपनीचे ४९% भागभांडवल खरेदी केले होते. आज संपूर्ण अधिग्रहण केलेल्या आकडेवारीप्रमाणे, कंपनीचे प्रवर्तक (Promoter) पवन मेहता आणि गगन मेहता यांच्याकडून हा हिस्सा एशियन पेंटसने खरेदी केला. १,६०,४०० इक्विटी शेअर्सच्या संपादनासह, एशियन पेंट्सकडे आता व्हाईट टीकच्या इक्विटी शेअर भांडवलाचा संपूर्ण १००% हिस्सा झाला ज्यामुळे ती पूर्णपणे आता एशियन पेंटस कंपनीच्या मालकीची उपकंपनी बनली आहे.

याच कंपनीचा आर्थिक वर्ष २०२३ मधील जूनपर्यंत कंपनीने व्हाईट टीकचे ११% समभाग खरेदी केले होते त्यापूर्वी एप्रिल २०२२ मध्ये ४९% हिस्सा खरेदी केला होता.

काल किंमतीवर शेअर बंद झाला?

काल एशियन पेंटस समभाग (Share) बीएसईवर ३.०६% वाढत २३५९.२५ रुपयांवर बंद झाला आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मागच्या वर्षी कंपनीच्या शेअरने १६ सप्टेंबर २०२४ मध्ये नवा उच्चांक (All Time High) झाला होता ज्याची किंमत ३३९४ रूपयांवर पोहोचली होती.
Comments
Add Comment

भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

मुंबई  : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील

महिला एकदिवसीय क्रमवारीत लॉरा वुल्फार्ट अव्वल

स्मृती मानधना दुसऱ्या स्थानावर घसरली; जेमिमाची 'टॉप १०' मध्ये दमदार एन्ट्री मुंबई : नुकताच महिला वनडे वर्ल्ड कप

मुंबई महापालिकेच्या या दोन विभागांना लाभले कायम सहायक आयुक्त

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सहायक आयुक्तपदांच्या अनेक जागा रिक्त असून अनेक ठिकाणी प्रभारी सहायक

मेट्रो १' तात्पुरती विस्कळीत; प्रवाशांची तारांबळ

मुंबई : घाटकोपर- अंधेरी- वर्सोवा मेट्रो- १' सेवा तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास विस्कळीत

बॅगच्या अस्तरमध्ये लपवले होते ८७ लाख; दुबईहून आलेल्या प्रवाशाला अटक!

मुंबई कस्टम्सची मोठी कारवाई; विदेशी चलनाचा मोठा साठा जप्त मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

२०११ च्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला १३ वर्षांनी जामीन!

उच्च न्यायालयाने १ लाख रुपयांच्या जामिनावर केली सुटका मुंबई : १३ जुलै २०११ च्या भीषण तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी