मुंबईतील व्हीएन देसाई रुग्णालयात हल्ला, रुग्णासह डॉक्टर आणि कर्मचारी जखमी

मुंबई: सांताक्रूझ येथील व्हीएन देसाई रुग्णालयातून एक मोठी बातमी समोर येत आहे, राहुल अशोक गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने रुग्ण संजय गुप्ता याच्यावर बांबूच्या काठीने हल्ला केला. त्याला रोखणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना देखील त्याने बेदम मारहाण केली. यादरम्यान त्याने रुग्णालयातील काही उपकरणेही तोडली. आरोपीला जागीच पकडण्यात आले आणि पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सध्या आरोपी वाकोला पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. 

मुंबईतील सांताक्रूझ येथील व्हीएन देसाई (VN Desai) सरकारी रुग्णालयात गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथे एका व्यक्तीने अचानक रुग्णालयात प्रवेश केला आणि रुग्ण तसेच कर्मचाऱ्यांवर बांबूच्या काठीने हल्ला केला. शुक्रवारी वाकोला पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने या प्रकरणाची पुष्टी केली. आरोपीचे नाव राहुल अशोक गुप्ता (वय ३४) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तो थेट रुग्णालयाच्या आवारात घुसला आणि रुग्ण संजय गुप्ता यांना बांबूच्या काठीने मारहाण करू लागला. सुरक्षा रक्षक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांच्यावरही हल्ला केला.  हल्ल्यामध्ये कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर डॉ. सय्यद जिलानी हे देखील जखमी झाले. याशिवाय, आरोपींनी रुग्णालयातील फर्निचर आणि इतर वस्तूंचेही नुकसान केले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी एकत्रितपणे आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राहुल गुप्ता हा एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतो आणि त्याचे रुग्ण संजय गुप्ता यांच्याशी जुने वैर होते. त्यामुळे त्याने हल्ला केला. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात आहे आणि रुग्णालयाचे झालेले नुकसान देखील तपासले जात आहे.
Comments
Add Comment

Nashik Vidhan Parishad Election Result 2026 Gokul Geete : नाशिकमध्ये महायुतीला मोठा धक्का; बंडखोर गोकुळ गीते यांचा दणदणीत विजय

नाशिक: राज्यभराचे लक्ष लागलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा

Legislative Council Election 2026 : आज ११ जागांचा निकाल; ६ जागांवर उमेदवार आधीच बिनविरोध विजयी

मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीचा निकाल आज (सोमवारी) जाहीर

Belgium vs Iran FIFA World Cup 2026 : इराणविरुद्ध गोलशून्य बरोबरीनंतर बेल्जियमची अडचण वाढली

फिफा विश्वचषकातील गट ‘जी’ मधील सामन्यात बेल्जियमला इराणविरुद्ध ०-० अशी गोलशून्य बरोबरी स्वीकारावी लागली. या

Mumbai Weather : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील काही तासांसाठी ऑरेंज अलर्ट

मुंबई : मुंबईत (Mumbai) आज (22 जून 2026) सकाळपासून जोरदार पावसाला (Rains) सुरुवात झाली असून भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3

Bank News : बँकेत अडकलेत जुने पैसे? जाणून घ्या पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया

मुंबई : अनेकदा आपले पूर्वज किंवा कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य यांनी बँकेत ठेवलेली मुदत ठेव (Fixed Deposit-FD), आवर्ती ठेव (Recurring

International Yoga day : योग हे समाजाला जोडण्याचे माध्यम

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त मत मुंबई (विशेष प्रतिनिधी ) योगचा