मुंबईतील व्हीएन देसाई रुग्णालयात हल्ला, रुग्णासह डॉक्टर आणि कर्मचारी जखमी

  105

मुंबई: सांताक्रूझ येथील व्हीएन देसाई रुग्णालयातून एक मोठी बातमी समोर येत आहे, राहुल अशोक गुप्ता नावाच्या एका व्यक्तीने रुग्ण संजय गुप्ता याच्यावर बांबूच्या काठीने हल्ला केला. त्याला रोखणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना देखील त्याने बेदम मारहाण केली. यादरम्यान त्याने रुग्णालयातील काही उपकरणेही तोडली. आरोपीला जागीच पकडण्यात आले आणि पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सध्या आरोपी वाकोला पोलिसांच्या ताब्यात असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. 

मुंबईतील सांताक्रूझ येथील व्हीएन देसाई (VN Desai) सरकारी रुग्णालयात गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथे एका व्यक्तीने अचानक रुग्णालयात प्रवेश केला आणि रुग्ण तसेच कर्मचाऱ्यांवर बांबूच्या काठीने हल्ला केला. शुक्रवारी वाकोला पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने या प्रकरणाची पुष्टी केली. आरोपीचे नाव राहुल अशोक गुप्ता (वय ३४) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तो थेट रुग्णालयाच्या आवारात घुसला आणि रुग्ण संजय गुप्ता यांना बांबूच्या काठीने मारहाण करू लागला. सुरक्षा रक्षक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांच्यावरही हल्ला केला.  हल्ल्यामध्ये कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर डॉ. सय्यद जिलानी हे देखील जखमी झाले. याशिवाय, आरोपींनी रुग्णालयातील फर्निचर आणि इतर वस्तूंचेही नुकसान केले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी एकत्रितपणे आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राहुल गुप्ता हा एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवतो आणि त्याचे रुग्ण संजय गुप्ता यांच्याशी जुने वैर होते. त्यामुळे त्याने हल्ला केला. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केली जात आहे आणि रुग्णालयाचे झालेले नुकसान देखील तपासले जात आहे.
Comments
Add Comment

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

'प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: बाजार उसळले! दोन दिवसांच्या घसरणीला 'या' ट्रिगरचा 'स्पीडब्रेकर'

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाने दोन दिवसांच्या घसरणीला 'स्पीडब्रेकर' लावण्याचे काम केले आहे.

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक