अंधश्रद्धेतून महिलेचा खून, आरोपीस अटक

कळवा : कळवा स्टेशन जवळील सीमा हाईट्स या इमारती मध्ये मजुरीचे काम करणाऱ्या महिलेची हत्या करून, तिचे दागिने चोरून नेणाऱ्या तीन आरोपींना कळवा पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी बिहार राज्यातून अटक केली आहे. याबाबत माहिती देताना सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांनी सांगितले की, पंधरा दिवसांपूर्वी तीन आरोपी हे कळवा झोपडपट्टी येथे राहिले, हत्या करण्याच्या उद्धेशानेच ते बिहार येथून आले होते.


भारतात अजून अंधश्रद्धा खूप आहे. बिहार सारखे राज्य सुद्धा अजून मागास आहे, बिहारमधील खगडिया या जिल्ह्यातील गावात अशी अंधश्रद्धा आहे की जर दागिने चोरी करायला सुरुवात करायची असेल तर त्या अगोदर एका महिलेची हत्या करायची, तो एक शुभशकून मानला जातो, आणि यासाठी ते तीनही आरोपी बिहार मधून इथे आले. १४ जूनला त्यांनी शांताबाई चव्हाण या बिगारी काम करणाऱ्या महिलेला सीमा हाईट्स या बिल्डिंग येथे कामानिमित्त नेले आणि तिची चाकूने वार करून हत्या केली.


जाताना त्यांनी तिच्या गळ्यातील आणि कानातील दागिने काढून घेऊन ते विकले होते. कळवा पोलिसांनी आणि गुन्हे शाखेने एकत्रित तपास करत कोणताही पुरवा नसताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे, सिसिटीव्ही तपासात हे आरोपी बिहारला पळून गेल्याचे शोधून काढले.


पोलिसांची तीन पथके बिहार राज्यातील खगडिया येथे पोहचली आणि तिन वेगवेगळ्या ठिकाणाहून या तिनही आरोपिंना त्यांनी ताब्यात घेतले, त्यातील एकाच्या घरातून एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतूसे त्यांनी हस्तगत केली. या तिघांना कळवा पोलीस स्टेशन येथे आणल्यावर त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले आणि हत्या झालेल्या महिलेचे दागिने विकून त्यांच्या अकाऊंटला जमा झालेले बावीस हजार रुपये जप्त केले, न्यायालयाने यातील दोन आरोपींना १ जुलैपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.

Comments
Add Comment

MCCL : डोंबिवलीत क्रिकेटचा महाधमाका!

डोंबिवली - डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन

मीरा भाईंदर होणार देशातील पहिले फ्री वायफाय शहर

भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांना विनामूल्य वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. १५ डिसेंबर

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील

जलमापक सहा महिन्यांपासून बंद; पाणीपुरवठा खंडित होणार

नादुरुस्त जलमापक बदलण्यासाठी पालिकेची मोहीम भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेकडून शहरातील जलमापक जर सहा

प्रचार तोफा थंडावण्यापूर्वी मतदानाच्या तारखांमध्ये केला बदल, निवडणूक अधिकाऱ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण

ठाणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या प्रचार तोफा आज थंडावणार आहेत.

बाल हक्क आयोगाचे कडोंमपा अधिकाऱ्यांवर चौकशीचे आदेश

ड्रेनेजमध्ये पडून बालक मृत्यूप्रकरण कल्याण  : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निष्काळजीपणामुळे डोंबिवली येथे