पावसाळ्यात घराला सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक गोष्टी

भारतात मान्सून दाखल झाला आहे, तरीही अनेक घरमालकांनी अजूनही पावसाळ्याच्या समस्यांवर तोडगा काढलेला नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घर आणि परिसराची मान्सूनच्या दृष्टीने तयारी केल्यास कीटकांचा प्रादुर्भाव, घराचे नुकसान आणि आरोग्यविषयक समस्या टाळता येतात.


मान्सूनच्या हंगामात डास, वाळवी, झुरळे आणि उंदीर अधिक सक्रिय होतात. वाढती आर्द्रता आणि साचलेले पाणी यामुळे त्यांची संख्या वाढते. अर्थात, वेळेवर तयारी केल्यास त्यांचा त्रास थांबवता येतो.


डासांची संभाव्य उत्पत्ती स्थाने नष्ट करा
पावसाळ्यापूर्वी तुमच्या घराची तपासणी करा आणि पाणी साठू शकेल अशा जागा शोधा. गटारे आणि पावसाचे साठलेले पाणी थेट जमिनीत नेऊन सोडणारे पाईप स्वच्छ करा, त्यात अडकलेली पाने किंवा कचरा काढून टाका. यामुळे ड्रेनेजला अडथळा येणार नाही आणि पाणी साचून राहणार नाही.


घराबाहेर ठेवलेल्या कुंड्या आणि सजावटीच्या वस्तू तपासा. पावसाचे पाणी साठू शकते अशा कोणत्याही वस्तू उलट्या करून ठेवा. जुने टायर, बादल्या आणि न वापरलेली भांडी कपाटात बंद करा किंवा टाकून द्या. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी धूर फवारणी (Fogging) करा.


छताची आणि भिंतींची दुरुस्ती
तुमच्या छताची तपासणी करा आणि कोणत्याही खराब झालेल्या टाइल्स किंवा जिथून गळती होऊ शकेल अशा जागा दुरुस्त करा. अगदी लहान गळतीमुळेही वाळवीच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. भिंतींमधील भेगा सील करा आणि ओलावा आत जाऊ नये यासाठी खिडक्या व दरवाज्यांभोवतीच्या भेगा भरून टाका.


वाळवी नियंत्रित करण्यासाठी आणि पावसाळ्यात तुमच्या घराचे संरक्षण करण्यासाठी बॅनेस्ट 20, डिसेक्ट टीसी (Disect TC) आणि इमिडागोल्ड प्लस (Imidagold Plus) यांसारखी उत्पादने उपयुक्त आहेत.


घराची सुरक्षा मजबूत करा
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच खिडक्यांची तावदाने आणि दारांची कुलुपे बसवा किंवा ती दुरुस्त करा. माशा, डास अशा उडणाऱ्या कीटकांपासून बचाव करण्यासाठी हे तुमचे पहिले संरक्षण आहे. अतिरिक्त संरक्षणासाठी, अॅडेप्ट डब्ल्यूपी (Adept WP) आणि डिमिलिन 22 एससी (Dimilin 22 SC) सारखी उत्पादने प्रभावी ठरू शकतात.


पडद्यांना भोकं पडली आहेत का हे तपासा आणि खराब झालेले पडदे बदला. बेसमेंट (असल्यास) तसेच स्टोअर-रूम सारख्या सामान ठेवण्याच्या खोल्या स्वच्छ आणि व्यवस्थित करा. लहान कीटक लपू शकतील असे कार्डबोर्ड बॉक्स, जुनी वर्तमानपत्रे किंवा वापरात नसलेल्या गोष्टींची पावसाळ्यापूर्वीच विल्हेवाट लावा.


पावसाळ्यात येणारी ओल आणि कीटकांचा त्रास पाहता, खोक्यात काही सामान ठेवले असेल तर ते बदलून प्लास्टिकच्या डब्यांमध्ये किंवा कपाटांमध्ये ठेवा. यामुळे कीटकांचा त्रास वाचेल आणि ओलही येणार नाही.


पर्यावरणपूरक प्रतिबंधकांचा पर्याय निवडा
निलगिरी आणि लेमनग्रास तेल यांसारख्या वनस्पतींवर आधारित घटकांपासून बनवलेले पर्यावरणपूरक प्रतिबंधक (Eco-friendly repellents) निवडा. बालरोगतज्ज्ञांनी प्रमाणित केलेले आणि विषारी नसलेले पर्याय शोधणे जास्त उत्तम. यामुळे हानिकारक रसायनांपासून सुटका होईल, त्यांचा प्रभाव दीर्घकाळ टिकेल आणि नैसर्गिक संरक्षण मिळेल. ते तुमच्या घरासाठी सुरक्षित आणि शाश्वत पर्याय ठरेल.


घरातील तयारीची यादी
पावसाळ्यातील आर्द्रतेमुळे परिस्थिती अधिक बिकट होण्यापूर्वी तुमचे घर स्वच्छ करा. स्वयंपाकघर आणि बाथरूमकडे विशेष लक्ष द्या, सर्व पृष्ठभाग पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडे असल्याची खात्री करा. बाथरूम तसेच स्वयंपाकघरात जर एक्झॉस्ट पंखे नसतील तर ते बसवून घ्या.


धान्य साठवण्याची जागा सुरक्षित करा. तसेच सर्व कोरड्या वस्तूंसाठी हवाबंद कंटेनरची (Airtight containers) व्यवस्था करा. पावसाळ्यात कीटक अन्नाच्या शोधात फिरत असतात, त्यामुळे अन्नाची योग्य साठवणूक महत्त्वाचे आहे. झुरळांना दूर ठेवण्यासाठी, एन्सुरिका (Ensurica) वापरा, जो झुरळ नियंत्रणासाठी दीर्घकाळ टिकणारा एक प्रभावी उपाय आहे.


पावसाळापूर्व योग्य नियोजन करा
देखभालीच्या नियमित कामांसाठी एक सवय लावून घ्या. पावसाळ्यात तुम्हाला करावी लागणारी साप्ताहिक स्वच्छता, साफसफाई, जोरदार पाऊस झाल्यास ओलाव्याची तपासणी तसेच घरात कीटक आले आहेत का याची पाहणी, या सगळ्या गोष्टी नियमितपणे करा. समस्या निर्माण होण्यापूर्वीच उपाययोजना करणे ही पावसाळ्याच्या यशस्वी तयारीची गुरुकिल्ली आहे.


पावसाळ्याच्या समस्यांचा आधीच विचार करून, त्यावर उपाययोजना करून तुम्ही असे वातावरण तयार करू शकता जे नैसर्गिकरित्या कीटकांच्या संसर्गाचा आणि पावसाळ्यातील ओलाव्याशी संबंधित समस्यांचा आधीच प्रतिकार करते. या तयारीमुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला देखील पावसाळ्याची मजा घेता येते.

Comments
Add Comment

The Ganeshutsav Podcast : 'The Ganeshutsav Podcast' (TGP) चा डंका! चिराग चंद्रकांत खिलारे यांनी जगातील पहिले 'हिंदू उत्सव' पॉडकास्ट सुरू करून मूर्तिकारांना दिले व्यासपीठ

मुंबई : भारतातील समृद्ध उत्सव संस्कृतीला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी १७ जुलै २०२४ रोजी 'TGP (The Ganeshutsav Podcast)' या विशेष

दिवसा कडक ऊन, रात्री थंडी! ऑक्टोबर हिटमुळे आरोग्याची काळजी कशी घ्याल?

मुंबई: पावसाळ्यानंतर आता पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात 'ऑक्टोबर हिट'ने जोर धरला आहे. दिवसा कडक उन्हाळा आणि रात्री

सलग १५ दिवस बीट ज्युस प्यायल्यास होणार 'या' ५ लोकांना आरोग्यदायी फायदे

बीट हे एक पोषकद्रव्यांनी भरलेले कंदमूळ आहे, जे डाएटमध्ये समाविष्ट केल्यास शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

लाडक्या बहिणीला काय गिफ्ट द्यायचं? 'या' 5 हटके आयडियाजने द्या जबरदस्त सरप्राईज

भावाबहिणीच्या प्रेमळ नात्याचे प्रतीक असलेला भाऊबीज हा सण दिवाळीनंतर लगेच साजरा केला जातो. यंदा हा सण २३ ऑक्टोबर

दह्यात मिसळा ही एकच गोष्ट, खराब कोलेस्टेरॉल होईल झटक्यात कमी

How To Control Bad Cholesterol: आजच्या धावपळीच्या आणि असंतुलित आहाराच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्यविषयक समस्या भेडसावत आहेत.

साखरेचे सेवन नियंत्रित केल्यास शरीराला होतील 'हे' फायदे!

अनेक भारतीय घरांमध्ये सकाळची सुरुवात चहाने किंवा कॉफीने होते. त्यामुळे दिवसाची सुरुवातच साखरेने होते. साखर