जिल्ह्यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात

सहा हजार हेक्टरवर भातपेरणी, जिल्ह्यात ८९ हजार हेक्टरवर होणार भाताची लागवड


अलिबाग  : पावसाळ्याला यंदा मे महिन्यापासून सुरुवात झाली खरी; परंतु जून महिन्यातच खऱ्या अर्थाने खरिपाच्या हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यात यावर्षी खरिपात ८९ हजार १६८ हेक्टरवर भाताची लागवड होणार असून, आतापर्यंत जिल्ह्यात ६ हजार १३५ हेक्टरवर भात पीक बियाण्याची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात काही भागात जूनच्या सुरुवातीच्या काळात पेरण्या झालेल्या शेतीमध्ये आता लावणीची कामेही सुरू झाली आहेत.


यावर्षी जवळजवळ एक महिना आधीच मे महिन्यात पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या पीक नियोजनावर परिणाम झाला. मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. पाऊस पुन्हा जूनमध्ये विश्रांती घेण्याची भीती शेतकऱ्यांना होती. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेरणीच्या कामांना वेग येत असतो. त्यानंतर पावसाचे प्रमाण वाढून पेरलेले बियाणे चांगल्याप्रकारे तयार होते. दरवर्षीच्या या वेळापत्रकात क्वचित फरक पडतो.


मात्र यावर्षी पावसाने जवळजवळ एक महिना आधीपासून सुरुवात केल्याने शेतकरी संभ्रमात पडले होते. रायगड जिल्ह्यात यावर्षी अलिबाग तालुक्यातील १११५७ हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार आहे. तालुक्यात सध्या ८९० हेक्टर भात बियाण्याची पेरणी झाली आहे. पनवेलमध्ये ७९२७ हेक्टरवर भात लागवड होणार असून, सध्या २८० हेक्टरवर पेरणी झाली आहे. कर्जतमध्ये ९०२४ हेक्टरवर लागवड होणार असून, ६७५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.


खालापुरात २७१३ हेक्टरवर भात लागवड होणार असून, १२७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. उरणमध्ये २३०९ हेक्टरवर लागवड होणार असून, १७३ हेक्टरवर भात पेरणी झाली आहे. सुधागडात २८१६ हेक्टरवर भात लागवड होणार असून, २५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.


पेण तालुक्यातील ११६०४ हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार असून, सध्या ९६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. महाड तालुक्यातील ९०५० हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार असून, सध्या ८५१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. माणगाव तालुक्यातील ११७९५ हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार असून, सध्या ५१० हेक्टरवर पेरणी झाली आहे. रोह्यात ९१९१ हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार असून, ५९१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.


पोलादपुरात ३२३५ हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार असून, २४९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मुरुडमध्ये ३३०० हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार असून, ३०३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. श्रीवर्धनमध्ये १४०३ हेक्टरवर लागवड होणार असून, १०४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्हसळामध्ये २११७ हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार असून, १२९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तळा तालुक्यात १५२१ हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार असून, ३४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Comments
Add Comment

वसई-विरारमध्ये ४ माजी नगरसेवक भाजपच्या गळाला

विरार : वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीला भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. बविआचे एकापाठोपाठ एक पदाधिकारी व

वसईत आयकर विभागाच्या धाडी, हॉटेल व्यवसायिकाच्या मालमत्तेची छाननी

वसई : राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान सुरू असताना वसईत आयकर विभागाने एका हॉटेल व्यावसायिकाच्या

डहाणू नगर परिषद निवडणुकीत थेट लढत!

पालघर, वाडा, जव्हारमध्ये तिरंगी लढत पालघर : नगर परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक

वाडा नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत

कुडूस  : वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात असून वाडा नगरपंचायत निवडणुकीत खरी लढत ही

वसई-विरारमध्ये ५२ हजार दुबार मतदार

मतदारांकडून लिहून घेणार हमीपत्र विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

चार नगर परिषद निवडणुकीसाठी १२५ मतदान केंद्र ; प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

पालघर : पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार, या नगर परिषद आणि वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज