सावरकरांचं ‘संगीत संन्यस्त खड्ग’ पुन्हा रंगमंचावर

  62

मुंबई :'संगीत संन्यस्त खड्ग' हे नाटक सावरकर दर्शन प्रतिष्ठानच्या वतीने नव्या स्वरूपात रंगमंचावर येणार आहे.या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग ८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता रवींद्र नाट्य मंदिर येथे सादर होणार आहे.प्रतिष्ठानचे सचिव व या नाटकाचे निर्माते रवींद्र साठे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
स्व. सुधीर फडके यांनी स्थापन केलेली सावरकर दर्शन प्रतिष्ठान ही संस्था स्वा. सावरकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करत. याचाच एक भाग म्हणून हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणलं जाणार आहे. सावरकरांचे विचार, साहित्य आजच्या पिढी पुढे आणणे हे सादरीकरणाच मुख्य उद्दिष्ट्य आहे. हे नाटक कालसुसंगत असल्याकारणाने याचे महाराष्ट्रभर १०० प्रयोग करण्याचा संस्थानाचा मानस आहे. सर्वसामान्यांना परवडतील असे ३०० /२००/१०० इतकेच तिकीटदर आकारण्यात येणार असल्याचं रवींद्र माधव साठे यांनी सांगितले. हे नाटक नव्या पिढीतील तरूण सादर करणार आहेत.

नाट्यसंपदा कला मंचाचे अनंत पणशीकर हे नाटकाचे सहनिर्माते असून मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध कलाकार व दिग्दर्शक ऋषीकेश जोशी यांनी नाटकाची रंगावृत्ती आणि दिग्दर्शन केले आहे. या नाटकाला संगीतकार कौशल इनामदार यांच संगीत लाभलं आहे.सावरकरांचे भाषासौंदर्य आणि त्यांच्या लेखांतून दर्शवणारी भव्य दृकश्राव्यता मला कायम भुरळ घालते. हे नाटक त्याचं उत्तम उदाहरण आहे. व्यावसायिक गणित मांडताना आम्हाला सावरकर प्रतिष्ठानची खूप मदत झाली.असं या नाटकाचे सहनिर्माते अनंत पणशीकर म्हणाले.

हे नाटक म्हणजे ‘अहिंसेचे तत्वज्ञान’ आणि ‘राष्ट्रहित’ यातील द्वंद्व आहे.या नाटकात सांगितलेले अडीच हजार वर्षांपूर्वीचे विचार आजही तंतोतंत खरे ठरतात.तेच विचार, आदर्श या नाटकातून नवीन पिढीपर्यंत पोहचवण्याचा आमचा निर्धार असल्याचे दिग्दर्शक ऋषीकेश जोशी यांनी यावेळी सांगितले.
मयुरा रानडे, ओंकार कुलकर्णी, केतकी चैतन्य, ओमप्रकाश शिंदे आणि ऋषिकेश जोशी आदि कलाकारांचा या नाटकात समावेश आहे.भव्य आणि आकर्षक सेट्स, देखणी वेशभूषा, कलाकारांचा अभिनय आणि सावरकरांचे तेजस्वी विचार ही 'संगीत संन्यस्त खड्ग' या नाटकाची वैशिष्ट्ये आहेत. १९३१ साली मा. दीनानाथ मंगेशकर यांनी हे नाटक रंगमंचावर आणले होते. यातील 'शतजन्म शोधताना’, ‘मर्मबंधातली ठेव ही’,‘सुकतात ही जगी या’.. अशी गाणी स्वतः दीनानाथांनी आपल्या गायकीने आणि संगीताने अजरामर केली आहेत. ८ जुलै १९१० रोजी स्वा. सावरकरांनी मार्सेलिस येथे ब्रिटिश जहाजातून जगप्रसिध्द उडी मारली होती. या दिवसाचे औचित्य साधून प्रतिष्ठानने ८ जुलै रोजी शुभारंभाचा प्रयोग योजला आहे. हे नाटक नव्या स्वरूपात व्यावसायिक रंगमंचावर येत असून देशात जिथे जिथे मराठी समाज आहे तेथे हे नाटक पोहोचेल. याचे १०० प्रयोग करण्याचा प्रतिष्ठानचा संकल्प आहे, असे प्रतिपादन रवींद्र साठे यांनी केले.

नाटकाचं नेपथ्य संदेश बेंद्रे,प्रकाशयोजना अमोघ फडके,नृत्ये सोनिया परचुरे, वेशभूषा मयूरा रानडे, रंगभूषा श्रीकांत देसाई यांनी केली आहे. नाटकाचे सूत्रधार दिपक गोडबोले आहेत. या नाटकास अधिकाधिक लोकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Add Comment

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

‘जेलर २’मध्ये रजनीकांत - मिथुन यांची जोडी पुन्हा झळकणार

साउथचा सुपरस्टार आणि चाहत्यांच्या मते ‘भगवान’ असलेले रजनीकांत सध्या त्यांच्या ‘कुली’ या चित्रपटामुळे प्रचंड

‘घरत गणपती’ २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणार

का ही कलाकृती या कायम पाहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. अशा