अलिबाग-वडखळ महामार्गावर खड्डेच खड्डे; लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

अलिबाग : अतिवृष्टीमुळे अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गावर केलेली तात्पुरती मलमपट्टी उखडून गेल्याने या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्याचा सर्वच वाहन चालकांना कमालीचा त्रास होण्याबरोबरच दुचाकीस्वारांचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मार्गाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास स्थानिकांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.


अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्ग १६६-ए हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावर मोठी विविध प्रकारच्या वाहनांची वर्दळ असते. मात्र हा मार्ग सर्व बाजुंनी दुर्लक्षित असून, या मार्गावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहे. यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी होणारे अपघात गंभीर ठरत आहे.



दुचाकीस्वार विद्यार्थी, पालक, रुग्णवाहिका व गर्भवतींना याचा फटका बसत आहे. त्यामुळे स्थानिक चिंतेत आहेत. महामार्गाच्या या स्थितीच्या निषेधार्थ, वटपौर्णिमेदिवशी अलिबागच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील खड्ड्यांत काहींनी वटवृक्षाची रोपे लावली होती. त्यानंतरही संबंधित विभागाला जाग येत नसल्याचे पाहून अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी स्वखर्चाने काही भागांत पेव्हरब्लॉक बसविले. तरीही महामार्ग अधिकारी व जिल्हा प्रशासनास जाग येत नसल्याने प्रवाशांमध्ये संताप आहे. या मार्गावरून विविध खात्यांचे मंत्री, लोकप्रतिनिधी, तसेच जिल्हा प्रशासनाचे उच्च पदस्थ अधिकारी प्रवास करीत असतात. त्यांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक संताप व्यक्त करीत आहे. नेमेचि येतो पावसाळा. अन् खड्ड्यांचा आलाय कंटाला’अशी म्हणण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे.


दरम्यान, नुकताच फेरफटका मारला असता, रिलायन्स पंप, तीनवीरा, पोयनाड नाका, धरमतर पूल, जेएसडब्लू कंपनीपासून ते अलिबागपर्यंत जागोजागी खड्डे पडल्याचे दिसून आले. या खड्ड्यांमधून वाहने हेलकावे खात जाताना दिसून येत होती. जेएसडब्ल्यू कंपनीपासून ते वडखळ दरम्यानच्या मार्गावर साचणारे पाणी जाण्यासाठी नालेच नसल्याने तेथील मार्ग नेहमीच पाण्याखाली असल्याचे दिसून आले. याकडेही कोणाचे लक्ष नसल्य़ाने या पाण्य़ातून एखादे वाहन वेगाने गेल्यास ते पाणी दुचाकीस्वारांच्या अंगावर उडत असल्याचेही दिसून आले. या मार्गावर काहीठिकाणी मोठ्या भेगा पडल्याने तेथे मार्ग खचायला सुरवात झाली आहे. त्यातून कोणत्याही क्षणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.


या अरुंद मार्गाच्या दुतर्फा वाढलेली झाडेझुडपे, संरक्षक कठड्यांची झालेली मोडतोड, पोयनाड नाका, पेझारी नाका, कार्लेखिंड येथे होणारी वाहतूक कोंडी, मार्गाच्या कडेला बसणारे फेरीवाले, अनधिकृत बांधकामे यांचाही त्रास या मार्गावरून येजा करणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहनांना होत असतो. त्यामुळे वाहतूक पोलिसाची गस्त महत्वाची असताना ते वाहतूक पोलिस कोठेच गस्त घालताना दिसत नाहीत.

Comments
Add Comment

जागतिक प्रत्यारोपण क्रीडास्पर्धेत ईशान आणेकरचे घवघवीत यश

जलतरणात दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई ठाणे : अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्ती, दाते यांच्यासाठी होणार्या

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण

पंतप्रधान मोदींचा आज मणिपूर दौरा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरला भेट देणार आहेत, जिथे ते अनेक प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि एका

नवीन मोबाईल घेण्याचा विचार करताय का? तर हे तुमच्यासाठी आहेत चांगले ऑप्शन

ओप्पो १५ सप्टेंबरला भारतात नवीन F31 सिरीज स्मार्टफोन करणार लाँच

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड

‘मिशन वात्सल्य योजने’चा सर्व विधवा व एकल महिलांना मिळणार लाभ - आदिती तटकरे

मुंबई : कोविड १९ या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच विधवा महिलांना