MHADA Lottery : आता सर्वसामान्यांना घर खरेदी करता येणार, म्हाडाच्या ६२४८ घरांच्या किमतीत कपात...

मुंबई : MHADA house prices reduced सर्वसामान्यांना हक्काचं घर खरेदी करण्यासाठी म्हाडाकडून अल्पदरात (MHADA Price)  घरांची सोडत काढण्यात येते. मात्र, मुंबई, ठाणे, नागपूर यासारख्या शहरात घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्या आहेत. घरांच्या किमती अवक्याबाहेर गेल्यामुळे सर्वसामान्य लोकांना घरे खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता म्हाडाने सर्वसामान्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. म्हाडाने घरांच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.


म्हाडाच्या कोकण मंडळाने ६२४८ घरांच्या किमतीत कपात केली आहे. त्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांचं घर खरेदी (House Buying) करण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत. म्हाडाच्या कोकण मंडळाचे ठाणे जिल्ह्यातील खोणी आणि मौजे शिरढोण येथे मोठे गृहप्रकल्प आहेत. या गृहप्रकल्पात एकूण ६ हजार २४८ घरे आहेत. घरांच्या किंमती दिवसेंदिवस गगनाला भिडत चालल्या आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना हक्काचे घर घेणे परवडेनासे झाले आहे.


अशा परिस्थितीत 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी, कोकण मंडळाच्या 'मौजे शिरढोण' आणि 'मौजे खोणी' येथील गृहप्रकल्पातील ६ हजार २४८ सदनिकांच्या सुधारित विक्री किंमत प्रस्तावास मान्यता देऊन, हक्काचे घर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणले आहे.प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर या सदनिकांची विक्री सुरु आहे. या सुवर्णसंधीचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा आणि आपल्या घराचे स्वप्न साकार करा असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.


म्हाडाच्या घरांची किंमत किती रुपयांनी कपात केली जाणार ?


म्हाडाच्या कोकण मंडळाच्या गृह प्रकल्पातील ६ हजार २४८ घरांच्या सुधारित विक्री किमत प्रस्तावास दिलेल्या मान्यतेनुसार, मौजे शिरढोण येथील घरांच्या विक्री किमतीत १ लाख ४३ हजार ४०४ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. तर मौजे खोणी येथील घरांची विक्री किंमत १ लाख १ हजार ८०० रुपयांनी कमी झाली आहे.


तसेच सर्वसामान्यांसाठी दिवाळीत ५००० घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या म्हाडाची घरे मोक्याच्या ठिकाणी अल्पदरात असणार आहे त्याच्या नक्कीच फायदा सामान्य नागरिकांना होईल असा विश्वास म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पण त्यापूर्वी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या या लॉटरीत जवळपास 4000 घरांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जुलै महिन्यात ४००० घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्याची तयारी केली जात आहे. यापैकी कल्याण येथे तब्बल २५०० घरे ही खासगी विकासकाकडून म्हाडाला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घरे घण्याचे स्वप्न साकार होणार का ? ते पाहणं महात्वाचं असणार आहे.

















Comments
Add Comment

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल

नवरात्रीमध्ये करा या खास मार्केटमधून शॉपिंग , गरबा खेळताना उठून दिसाल गणेशोत्सव झाला कि वेध लागतात नवरात्रीचे.

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या