Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ जूनच्या रात्री कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या सामूहिक बलात्काराच्या संदर्भात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या तिघांपैकी दोघे विद्यार्थी आहेत, तर एक कॉलेजचा माजी विद्यार्थी असून सध्या तो तृणमूल काँग्रेसचा सदस्य असल्याचे म्हंटले जाते. ही घटना २५ जून रोजी संध्याकाळी ७.३० ते १०.५० दरम्यान घडल्याचे सांगण्यात येत आहे. 


बलात्कार प्रकरणी अटकेनंतर या तिन्ही आरोपींना अलीपूर न्यायालयात आज हजर करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी घटनेची चौकशी करण्यासाठी तिन्ही आरोपींसाठी १४ दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती, मात्र, न्यायालयाने आरोपींना पुढील मंगळवारपर्यंतच पोलिस कोठडीत ठेवण्याची परवानगी दिली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून दाखल केलेल्या एफआयआरनुसार, मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा (३१) आहे, जो महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि तृणमूल काँग्रेस छात्र परिषदेच्या (टीएमसीपी) युनिटचा अध्यक्ष आहे. याशिवाय, सह-आरोपींमध्ये झैब अहमद (१९) आणि प्रमित मुखर्जी (२०) यांचा समावेश आहे.



"त्यांनी मला हॉकी स्टिकने मारण्याचा प्रयत्न केला"


पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, "त्यांनी माझ्याशी लैंगिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना विरोध केला तेव्हा त्यांनी माझ्यावर अमानुष अत्याचार केले." तिने पुढे म्हंटले की"त्यांनी कॉलेजचे मुख्य गेट बंद केले होते. गार्ड असहाय्य होता आणि त्यांनी मला मदत केली नाही. ते मला जबरदस्तीने गार्ड रूममध्ये घेऊन नेले. माझ्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली. त्यांनी मला ब्लॅकमेल केले, माझ्या मित्राला मारण्याची आणि माझ्या पालकांना अटक करण्याची धमकी दिली." पीडितेने पुढे सांगितले की, "आरोपी माझ्यावर बलात्कार करत असताना, त्यांनी माझा व्हिडिओदेखील रेकॉर्ड केला आणि मला धमकी दिली की जर मी सहकार्य केले नाही तर ते व्हिडिओ सर्वांना दाखवतील. मी खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी मला हॉकी स्टिकने मारण्याचा प्रयत्न देखील केला. मला न्याय हवा आहे."



परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी गेली होती पीडिता


२५ जून रोजी दुपारी १२ वाजता कॉलेज कॅम्पसमध्ये परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी पीडिता गेली असता तिच्यासोबत ही घटना घडली. ती प्रथम कॉलेजच्या युनियन रूममध्ये जाऊन बसली. नंतर तिला मुख्य आरोपीने पकडले, ज्याने कॉलेजचे मुख्य गेट बंद करण्याची सूचना केली. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, सुरक्षा रक्षकाच्या खोलीत तिच्यावर बलात्कार करण्यात आला.



पोलिसांनी काय म्हटले?


पोलिस सूत्रांचा दावा आहे की एफआयआरमध्ये नाव देण्यात आलेले आरोपी हे दक्षिण कलकत्ता लॉ कॉलेजचे माजी विद्यार्थी/कर्मचारी आणि विद्यार्थिनी आहेत. तक्रारीनुसार, ही घटना २५.०६.२०२५ रोजी १९:३० ते २२:५० वाजेच्या दरम्यान दक्षिण कलकत्ता लॉ कॉलेजमध्ये घडली. तपासादरम्यान, पीडितेची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. साक्षीदारांची तपासणी करण्यात आली आणि त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. घटनेच्या ठिकाणाला भेट देण्यात आली आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी जतन करण्यात आले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकाता येथील तलबागन क्रॉसिंगजवळील सिद्धार्थ शंकर शिशु रॉय उद्यानाच्या समोरून कसबा पोलिस ठाण्याने दोन एफआयआर नामांकित आरोपींना अटक केली. दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तिसऱ्या एफआयआर नामांकित आरोपीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली. त्याचा मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आला. पोलिसांचे म्हणणे आहे की, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, प्रत्येक कोनातून तपास केला जात आहे.



राजकारण तापले


या प्रकरणावरून आता कोलकात्याचे राजकारण देखील तापले आहे.  भाजपचे अमित मालवीय यांनी या घटनेवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला आहे. X वरील बंगाली वृत्तपत्रातील बातमी शेअर करताना त्यांनी लिहिले, "भयानक! २५ जून रोजी कोलकात्याच्या उपनगर कसबा येथील लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि हा बलात्कार कॉलेजचा एक माजी आणि दोन शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी केला होता." त्यांनी असेही म्हटले की तृणमूल काँग्रेसचा एक सदस्य यात सहभागी होता. तथापि, त्यांनी त्यांच्या दाव्याला समर्थन देण्यासाठी कोणतेही पुरावे दिले नाहीत. ते म्हणाले, "ममता बॅनर्जी यांच्या राजवटीत पश्चिम बंगाल महिलांसाठी एक भयानक स्वप्न बनले आहे. बलात्कार ही एक सामान्य शोकांतिका बनली आहे."



आरजी कर प्रकरणानंतर १० महिन्यांनी ही घटना 


आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या १० महिन्यांनी ही घटना घडली आहे. एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तिचा मृतदेह कॉलेज कॅम्पसमधील एका सेमिनार रूममध्ये आढळला होता. 

Comments
Add Comment

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ