हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटीमुळे पाच जणांचा मृत्यू

कुल्लू : हिमाचल प्रदेशमधील कुल्लू आणि कांगडा जिल्ह्यांसह काही भागांमध्ये ढगफुटी, मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे प्रचंड नुकसान झाले. आतापर्यंत या संकटामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पाच जण बेपत्ता आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. हवामान विभागाकडून हिमाचल प्रदेशला रविवार २९ जून साठीही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

उना, बिलासपूर, सोलन, शिमला, सिरमौर, कांगडा, चंबा, कुल्लू आणि मंडी या हिमाचलमधील जिल्ह्यांमध्ये दोन - तीन दिवस मुसळधार पावसाची तसेच जमीन खचण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. महत्त्वाचे काम नसल्यास मुसळधार पाऊस पडत असताना घराबाहेर पडणे टाळा, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.



हिमाचल प्रदेशमधील तीन ठिकाणी ढगफुटी झाली आहे आणि नऊ ठिकाणी पूर आला आहे. या अचानक आलेल्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे, असे मुख्यमंत्री सुखविंदर सुखू म्हणाले म्हणाले.

आतापर्यंत २५० लोकांना वाचवण्यात आले आहे. ज्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे, त्यातील चार जणांची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले. जंगलातून एकाला वाचवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अचानक आलेल्या संकटामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे