Bangluru News : बंगळूरूत रील बनवता बनवता तोल गेला अन्... थेट १३व्या मजल्यावरून खाली

२० वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू


बंगळूरू : बंगळुरूमध्ये रील बनवताना एका २० वर्षीय तरुणीचा बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून खाली पडून जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुणी (२० वर्ष) बिहारची रहिवासी असून एका शॉपिंग मार्टमध्ये काम करायची. घटनेच्या दिवशी ती रात्री उशीरा आपल्या मित्रांसोबत परिसरातील बांधकामाधीन इमारतीच्या १३ व्या मजल्यावर पार्टी करायला गेली होती. त्यावेळी रील बनवत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडली. या घटनेमध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर तिचे मित्र घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी परप्पाना अग्रहारा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.



दक्षिण पूर्व विभागाच्या पोलीस उपायुक्त फातिमा यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. याबाबत माहिती देताना त्या म्हणाल्या की, मयत मुलगी आणि तिचे सहकारी इमारतीत पार्टी करत होते. नंतर ते टेरेसवर रील रेकॉर्ड करण्यासाठी गेले आणि ती घसरून पडल्याने तिचा मृत्यू झाला. सध्या तरी, नातेसंबंधातील समस्येमुळे हे घडले आहे की नाही हे आम्हाला माहिती नाही. सर्व काही तपासाधीन आहे. अनैसर्गिक मृत्यू अहवाल अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

२० जानेवारीपासून नितीन नवीन भाजपचे अध्यक्ष

नवी दिल्ली : नितीन नवीन यांना भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची घोषणा २० जानेवारी रोजी

लाल किल्ला स्फोट प्रकरणी एनआयएच्या तपासातून हाती आली धक्कादायक माहिती, २०२३ पासूनचा दहशतवाद्यांचा कट उघड

नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार स्फोटाच्या तपासात महत्वाची माहिती समोर आली

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी

वाढदिवसाची पार्टी, धुम्रपानास जबरदस्ती अन् कारमध्ये बलात्कार!

उदयपूरमधील आयटी कंपनीच्या मॅनेजरची 'ती' काळरात्र उदयपूर: राजस्थानमधील उदयपूर येथे एका खाजगी आयटी कंपनीच्या

भारतीय जॉब मार्केटची विक्रमी झेप; 'एआय'मुळे भरती प्रक्रियेला वेग

९ कोटींहून अधिक जॉब अॅप्लिकेशनची नोंद नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आणि रोजगार बाजारपेठेसाठी २०२५ हे

शाळांमध्ये सकाळचा नाश्ता देण्याची केंद्राची सूचना

शिक्षणासोबत पोषणावर भर नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांना संतुलित व पुरेसे पोषण मिळावे, या उद्देशाने केंद्र