Axiom 4: शुभांशू शुक्ला यांचे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये जोरदार स्वागत, ISSमध्ये प्रवेश करणारे पहिले भारतीय

नवी दिल्ली: भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लासह चारही अंतराळवर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये दाखल झाले आहे. स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर तेथील क्रू मेंबर्सनी त्यांचे अतिशय जोरदार स्वागत केले. आयएसएसमध्ये पोहोचल्यानंतर चारही अंतराळवीरांनी ह्यूस्टनमध्ये मिशन नियंत्रणाच्या दिशेने हात हलवले. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

स्पेस स्टेशनमध्ये जंगी स्वागत


आंतरराष्ट्रीय स्टेशनच्या क्रू मेंबर्सनी अ‍ॅक्सिओम ४ मिशनचे कमांडर पगी व्हिटनस यांचे स्वागत केले. तेथे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५. ४४ मिनिटांनी स्पेस स्टेशनमध्ये उतरले. मिशन पायलट शुभांशु शुक्ला व्हिटसन यांच्या मागे होते. शुक्लाहसह पोलंडचे इंजीनियर स्लावोज उज्नान्स्की व्हिस्नीव्स्की होते. हे एक मिशन तज्ञ आहेत.


अ‍ॅक्सिओम ४बाबत नासाचे विधान


पाचव्या अंतराळ उड्डाणावर पोहोचलेल्या व्हिटसन म्हणाले, येथे येऊन आम्ही खुश आहोत. एकांतात राहण्याची ही मोठी वेळ होती. येथे पहिल्यांदा खादा भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या प्रवासाला पोहोचला आहे.

नासाने जाहीर केलेल्या व्हिडिओमध्ये अंतरिक्ष यान अंतराळ स्टेशनजवळ येताना दिसले आणि डॉकिंग प्रक्रिया भारतीय वेळेनुसार ४.१५ मिनिटांनी पूर्ण झाली. अंतराळ यान आणि आयएसएस यांच्यात संचार आणि ऊर्जा स्थापित होण्यासोबतच डॉकिंगची प्रक्रिया पूर्ण झाली.

 
Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या