मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात जोरदार वाढ झाली आहे. अखेरीस शेअर बाजारात सेन्सेक्स (Sensex) १०००.३६ अंकांने वाढत ८३७५५.८७ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी (Nifty 50) ३०४.२५ अंकाने वाढ होत २५५४९.०० पातळीवर गेला आहे. दोन्ही निर्देशांकात समसमान म्हणजेच १.२१% वाढ झाल्याने बाजारातील ' बुलिश' (Bullish) वातावरण अधोरेखित झाले आहे. जागतिक बाजारपेठेत फेडरल व्याजदरात कपात उशीरा होईल का या चिंताग्रस्त वातावरणात आपल्या जोरदार फंडामेंटल आधारावर बाजाराने मात केली. परिणामी बाजारात मोठी वाढ झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ६०६.८८ अंकांनी वाढ झाल्याने सेन्सेक्स बँक निर्देशांक ०.९५% उसळला. बँक निफ्टीतही ३९७.२० अंकांची उसळी घेतल्यानंतर बँक निफ्टीही १.०३% वाढला. परिणामी बाजारात रॅली झालेली आहे.
सेन्सेक्स मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५६%,०.१२% वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत स्मॉलकॅपमध्ये तुलनात्मक दृष्ट्या वाढ झाली नाही. काल बीएसई स्मॉलकॅपमध्ये ०.६३% वाढ झाली होती. लार्जकॅप ब्लू चिप्स कंपन्यांनी चांगले प्रदर्शन केल्यावर तसेच मिडकॅपनेही बरा प्रतिसाद दर्शविल्यानंतर बाजारात वाढ झाली आहे. ही वाढ विशेषतः बाजारा तील पुढे जात असलेल्या हालचालींवर व क्षेत्रीय विशेष समभाग (Stocks) मुळे दर्शविली गेली.
निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) यामध्ये मिडिया (१.०९%), आयटी (०.१३%), रिअल्टी (१.००%) समभाग वगळता इतर क्षेत्रीय समभागात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ खाजगी बँक (०.४३%), तेल व गॅस (१.८६%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (१.५९%), कंज्युमर ड्युरेबल्स (०.८७%), मिडस्मॉल फायनांशियल सर्विसेस (०.६६%), मिडस्मॉल हेल्थकेअर (०.८१%), हेल्थकेअर (०.३८%) समभागात झाली आहे. विशेषतः सकाळी १.०९% वधारलेला वीआयएक्स (VIX Volatility Index) अस्थिरता निर्देशांक अखेरच्या सत्रापर्यंत -२.८७% घसरला आहे. त्यामुळे बाजारातील समभागांच्या किंमतींना स्थिरता प्राप्त झाली होती. दुसरीकडे बाजारातील तेजीचा मूड पाहता घरगुती गुंतवणूक दारांनी मोठ्या प्रमाणात आज गुंतवणूक केली असल्याची शक्यता आहे.
सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपयाही वधारल्याने बाजारात एकप्रकारे 'वेटेज' आले. डॉलरची घसरण झाल्यानंतर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनीही भारतीय शेअर बाजाराकडे लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. याशिवाय बाजारात सोन्याच्या व चांदीच्या किंमती स्थिर राहिल्याने बाजारात तरलता स्थिर राहण्यासही मदत झाली.
अमेरिकन बाजारातील फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष जेरोमी पॉवेल यांनी फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करण्यासाठी वाट बघितली पाहिजे असा पुनरुच्चार केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मध्यपूर्वेकडील युद्धविरामानंतर युएस बाजारात तीनदा वाढ झाली होती. मात्र कच्च्या तेलाच्या, सोन्याचांदीच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.पुन्हा एकदा आज युएस बाजारातील डाऊ जोन्स (Dow Jones) मध्ये ०.३६%, एस अँड पी ५०० (S&P500) मध्ये ०.००%, नासडाक (NASDAQ) ०.३१% वाढ झाली.आशियाई बाजारातील गिफ्ट निफ्टीत (१.३६%) वाढ झाल्यानंतर निकेयी (१.६२%) वाढ झाली आहे तर हेंगसेंग (Hengseng) मध्ये ०.६१% व शांघाई कंपोझिट (०.२२%) मध्ये घसरण झाली आहे.संध्याकाळपर्यंत सोन्याच्या निर्देशांकात ०.३१% वाढ झाली होती जी सकाळी ०.१३% पर्यंत आश्वासक मागणीमुळे झाली होती.
कच्च्या (Crude Oil) तेलाच्या WTI Futures निर्देशांकात ०.३४% वाढ झाली आहे तर Brent Future Index निर्देशांकात ०.२७% वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील रूपयांच्या तुलनेत डॉलरमध्ये २० पैशांची वाढ झाल्याने रूपयांची किंमत दुपारपर्यंत ८५.८७ पातळीवर पोहोचली होती.
विशिष्ट क्षेत्रीय समभागांनी आज चांगली कामगिरी केली होती.या कामगिरीमुळेच गेल्या तीन सत्रांमध्ये परदेशी गुंतवणूकदार निव्वळ विक्री करणारे अधिक होते तरीदेखील देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (DIIs) आलेल्या जोरदार गुंतवणूकीमुळे आघाडीच्या निर्देशांकांना चालना मिळाली परिणामी चालू महिन्यात आतापर्यंत, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) ५,६७० कोटींच्या भारतीय शेअर्सची रोख विक्री केली आहे. त्या तुलनेत, मे महिन्यात ६६,१९४ कोटींच्या निव्वळ खरेदीनंतर, घरगुती गुंतवणूकदारांनी याच कालावधीत जवळजवळ ७०,००० कोटींची खरेदी केली आहे. याखेरीज अमेरिकन - भारतीय बाजारपेठेत आगामी व्यापारी द्विपक्षीय करार (Bilateral Trade Agreement BTA) होणे अपेक्षित आहे त्यामुळे भावनात्मक दृष्टीने गुंतवणूकदारांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. भारत इंग्लंड यांच्यातीलही फ्री ट्रेड बोलणी अंतिम टप्यात पोहोचल्याने बाजारात सकारात्मकता कायम आहे.
बाजारातील तरलता वाढल्याने म्युचल फंड गुंतवणूकीतदेखील चालना मिळाली आहे. अधिकृत माहितीनुसार, गेल्या महिन्यात म्युचल फंड गुंतवणूकीत ५३२६० कोटींची उच्चांकी गुंतवणूक झाली होती त्या तुलनेत या महिन्यात म्युच्यल फंडात गुंतवणूक झाली नसली तरी या महिन्यात ३६००० कोटींची गुंतवणूक झाली आहे त्यामुळे एकंदरच बाजारात आज सकारात्मक चित्र बघायला मिळाले होते.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले की,'युद्ध विराम टिकत आहे हे हळूहळू स्पष्ट होत आहे. स्थिर कच्चे तेल अमेरिकेतील ट्रम्प शासन यांचा फेड रिझर्व्ह व्याज दरकपातीसाठीचा दबाव या सगळ्या परत एकदा बाजाराच्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी आहेत. भारताकरिता अपेक्षित ६.५ % जीडीपी या सर्व गोष्टींवर बाजार हळूहळू स्वार होण्याच्या तयारीत आहे.भारताची डिफेन्स,इन्फ्रास्ट्रक्चर,पाॅवर ही नेहमीचे चालणारे सेक्टर्स बरोबर एआय (AI) मध्ये मुकेश अंबानी ग्रूप मोठी गुंतवणूक करीत असल्याबद्दल बातम्या येत आहेत. अडाणी टोटल गॅस हे रिलायन्स पेट्रोल पंपावर सीएनजी विक्री साठी एकच येत असल्याची बातमी आहे. एकूणच मागील तीन चार वर्षापासुन सुरू असलेली जगातील मोठी- छोटी युद्ध संपण्याच्या मार्गावर दिसत आहेत.
नाटो देश वर्षाला ५% डिफेन्स बजेट ठेवणार आहेत.जे मागील अनेक वर्ष २% होते.जिओपाॅलीटीक़ल (राजकीय भौगोलिक) स्थिरता लवकरच येईल असे दिसत आहे जे जगातील सर्व बाजारासाठी सकारात्मक असेल.आज बाजार त्यामुळेच १००० पाॅईंट वर आहे.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'२६ जून रोजीच्या बेंचमार्क निर्देशांकांनी दैनिक कालावधीत अलिकडच्या एकत्रीकरण क्षेत्रापेक्षा वरच्या दिशेने ब्रेकआउट नोंदवले आहे, जे तेजीच्या सातत्यपूर्ण पॅटर्नचे संकेत देते आणि बाजारातील सहभागींमध्ये सकारात्मक भावना मजबूत होत असल्याचे प्रतिबिंबित करते. जूनच्या F&O मालिकेचा शेवट सकारात्मक पद्धतीने झाला, विजयी मालिका सलग चार एक्सपायरीपर्यंत वाढली, ज्यामुळे व्यापक बाजारात तेजीचा सूर कायम राहिला. बँक शेअर्सनी निफ्टी बँक निर्देशांक ५७,२६३.४५ या नवीन सर्वकालीन उच्चांकावर नेला. खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये झालेल्या मोठ्या खरेदीमुळे ही तेजी मुख्यत्वे घडली.
बंद होताना, सेन्सेक्स १,०००.३६ अंकांनी किंवा १.२१ टक्क्यांनी वाढून ८३,७५५.८७ वर पोहोचला आणि निफ्टी ३०४.२५ अंकांनी किंवा १.२१ टक्क्यांनी वाढून २५,५४९ वर पोहोचला. क्षेत्रीयदृष्ट्या, खाजगी बँका, तेल आणि वायू आणि धातू काउंटरमध्ये १-२% वाढ दिसून आली, तर रिअल्टी आणि मीडिया पॉकेट्समध्ये नफा वठवण्याचे प्रमाण स्पष्ट होते, जे प्रत्येकी सुमारे १% ने कमी झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांकाने ०.५% वाढीसह चांगली कामगिरी केली, तर स्मॉल-कॅप निर्देशांक मंदावलेल्या स्थितीत बंद झाला, स्टॉक-विशिष्ट मंदी दरम्यान तो मोठ्या प्रमाणात बदलला नाही.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर भाष्य करताना जिओजित इनव्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले की,'मध्यपूर्व युद्धबंदीच्या स्पष्ट स्थिरतेमुळे बेंचमार्क निर्देशांकाने गुंतवणूकदारांचा मजबूत विश्वास प्रतिबिंबित केला, ज्यामुळे संभाव्य पुरवठा साखळी व्यत्ययांवरील चिंता कमी झाल्या आहेत.यूएस आणि भारतीय १० वर्षांच्या बाँडमधील उत्पन्नाच्या प्रसारात घट झाल्यामुळे एफआयआयने होल्डिंग्ज कमी करणे सुरू ठेवले. तरलतेच्या परिस्थितीत सुधारणा आणि देशांतर्गत वापरात वाढ झाल्यामुळे डीआयआय निव्वळ खरेदीदार म्हणून उदयास आले. व्यापक बाजारपेठेत, बँकिंग आणि ऑटो सारख्या प्रमुख क्षेत्रांनी लक्षणीय नफा नोंदवला, ज्याला देशांतर्गत चलनवाढीच्या चिंता कमी केल्यामुळे पाठिंबा मिळाला.'
आजच्या बाजारातील निफ्टीवर भाष्य करताना बजाज ब्रोकिंग रिसर्चने म्हटले आहे की,'दैनिक चार्टवर निफ्टीने अलिकडच्या एकत्रीकरणापेक्षा निर्णायक पाऊल पुढे टाकले जे व्यापारी आणि गुंतवणूकदारांमध्ये वाढती आशावाद दर्शवते, एनएसई मासिक समाप्तीपूर्वी अभूतपूर्व पुट रायटिंग (Bullish Aggression) आणि कॉल अनवाइंडिंगने काल तेजीच्या आक्रमकतेचे संकेत दिले. आता निर्देशांक एकत्रीकरण क्षेत्राच्या वर गेला आहे, आम्ही पुढेही आमचे तेजीचे दृश्य कायम ठेवत आहोत. २५,७००-२५,७५० झोनपर्यंत कोणताही मोठा प्रतिकार न होता, आम्हाला अपेक्षा आहे की ही तेजी आणखी १५०-२०० अंकांनी वाढेल. नकारात्मक बाजूने, २५,३००-२५,३५० च्या आसपास आधार दिसत आहे.'
आजच्या बाजारातील सोन्यावर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की,' डॉलर निर्देशांकातील कमकुवतपणामुळे सोने मर्यादेपर्यंत मर्यादित राहिले, तर फेडरल रिझर्व्हने तात्काळ दर कपात न करण्याच्या भूमिकेमुळे भावनेवर परिणाम झाला. असे असूनही, चालू भू-राजकीय आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे सोन्याचा व्यापक कल सकारात्मक आहे. तथापि, रुपयाच्या वाढीमुळे देशांतर्गत सोन्याच्या किमतींमध्ये वाढ मर्यादित झाली आहे, ज्यामुळे मंदावलेला सूर निर्माण झाला आहे. बाजारपेठेतील सहभागींचे तात्काळ लक्ष आगामी यूएस कोअर पीसीई (Price Consumer Index) किंमत निर्देशांकावर आहे, जो फेड धोरणावर प्रभाव टाकू शकणारा एक प्रमुख चलनवाढ निर्देशांक आहे. नजीकच्या काळात एमसीएक्स गोल्ड ९५,५०० ते ₹९८,५०० रूपयांच्या श्रेणीत व्यापार होण्याची अपेक्षा आहे.'
आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले की ' डॉलर निर्देशांक ९७.०० च्या खाली घसरल्याने रुपया ३३ पैशांहून अधिक वधारून ८५.७५ वर स्थिरावला.कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने आणि डॉलर कमकुवत झाल्याने रुपयाला मोठा आधार मिळाला. जागतिक जोखीम भावना सुधारत असल्याने आणि निधीचा ओघ सुरू राहण्याची शक्यता असल्याने, येत्या काही दिवसांत रुपया ८५.२५ च्या दिशेने जाऊ शकतो.'