दादरमध्ये सुरांच्या रूपात अवतरणार पंढरपूर

  78

मुंबई : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वारीच्या निमित्ताने भक्तिपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. देवाला आळविण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे संगीत. प्रत्येकाला पंढरीची वारी करण शक्य होत नाही परंतु आपण सांगीतिक यात्रेतून देखील त्या परमेश्वराला आळवू शकतो. म्हणूनच आषाढी वारीच निमित्त साधून दादर मधील शिवाजी मंदिर येथे 'अवघे गर्जे पंढरपूर’ हा भक्तिरसाने परिपूर्ण कार्यक्रम रविवार, ६ जुलै २०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मानवी जीवन जगात असताना आपण मोहमायेत अडकतो परंतु भगवंत प्राप्ती हेच मानवी जीवनाचे अंतिम सत्य आहे. विठ्ठलाला मायबाप मानण्याची प्रथा वारकरी संप्रदायात आहे. म्हणूनच त्या सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी वर्षभर वारकरी आषाढी वारीसाठी आस लावून असतात.काहीजण तर वाढीची ओढ पुढच्या वर्षीसाठी देखील तशीच राहावी म्हणून गाभाऱ्यात विठोबाचं दर्शन न घेता फक्त कळसाच्या पाय पडून माघारी फिरतात.जर यावर्षी काही कारणास्तव तुमची वारी हुकली असेल तर त्याचा अनुभव तुम्ही एएसके' व 'दर्शन क्रिएशन्स' आणि 'अद्वैत थिएटर्स' यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राहुल भंडारे, समीर बापर्डेकर आणि अभिजीत जोशी यांच्या संकल्पनेतून सादर होणाऱ्या ‘अवघे गर्जे पंढरपूर’ या कार्यक्रमातून घेऊ शकता. अथांग भक्ति सागरात टाळ-मृदंगाच्या गजरात रसिकांना हा कार्यक्रम विठ्ठलमय करणार असून या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रायोजकत्व एम. के. घारे ज्वेलर्स, लोकमान्य मल्टिपर्पज को - ऑप. सोसायटी, मिनी मॅक्स ऍड्स प्रा. लि. ने स्वीकारले आहे.

अवघे गर्जे पंढरपूर हा कार्यक्रम अनेक दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणाने रंगणार आहे.संगीत संन्यस्त खड्ग', 'संगीत हाच मुलाचा बाप', 'संगीत एकच प्याला' इत्यादी नाटकांमधील आघाडीची अभिनेत्री अर्थात प्रसिद्ध गायिका संपदा माने, गायक श्रीरंग भावे, नचिकेत देसाई आणि स्वरा जोशी हे गायक-गायिका आपल सुरेल गायन सादर करणार आहेत.संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांचे संगीत कार्यक्रमाला लाभणार आहे.दीपाली केळकर यांच्या मधुर वाणीत कार्यक्रमच सूत्रसंचालन केलं जाणार आहे.

‘अवघे गर्जे पंढरपूर’ हा केवळ कार्यक्रम नसून एक संगीतमय यात्रा आहे. ६ जुलै २०२५, रविवार, दुपारी ४ वाजता, शिवाजी मंदिर, दादर येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्तिपूर्ण सांगीतिक अनुभव घ्या.
Comments
Add Comment

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अलिबागमध्ये चित्रीकरणाला सुरुवात

अलिबाग: दिग्दर्शक हेमंत ढोमे यांचा मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारा नवा चित्रपट 'क्रांतिज्योती

Bigg Boss 19 मध्ये आंतरराष्ट्रीय तडका, माईक टायसन आणि द अंडरटेकरची एन्ट्री होणार?

मुंबई : टीव्हीवरील लोकप्रिय रिॲलिटी शो "बिग बॉस" चा

संत विचारांनी भारावलेली कथा ‘फकिरीयत’

‘फकिरीयत’ या आगामी हिंदी चित्रपटाचा भव्य ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य

‘जागरण गोंधळ’ या गाण्याला गणेश चंदनशिवे यांचा आवाज

अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी ‘आरपार’ या सिनेमातून पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर

‘जेलर २’मध्ये रजनीकांत - मिथुन यांची जोडी पुन्हा झळकणार

साउथचा सुपरस्टार आणि चाहत्यांच्या मते ‘भगवान’ असलेले रजनीकांत सध्या त्यांच्या ‘कुली’ या चित्रपटामुळे प्रचंड

‘घरत गणपती’ २९ ऑगस्टपासून चित्रपटगृहात झळकणार

का ही कलाकृती या कायम पाहाव्या अशाच वाटतात. काही चित्रपटही असे असतात की जे पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. अशा