Ex Dividend: महाराष्ट्र स्कूटर्सकडून ६० रूपये एचडीएफसीकडून २२ रूपये 'या' १८ कंपन्यांचा Dividend कमावण्यासाठी आज अंतिम मुदत उरला शेवटचा अर्धा तास....

प्रतिनिधी: आज १८ कंपन्यांवर कमवायचा शेवटचा दिवस आहे. एकूण १८ कंपन्यांनी लाभांश (Dividend) जाहीर केलेला आहे. या कंपन्यांनी जाहीर केलेला लाभांश मिळवण्यासाठी आजच या शेअर्सची खरेदी करावी लागणार आहे.आज पर्यंत घेतलेल्या गुंतवणूकदारांनाच लाभांशच्या माध्यमातून परतावा मिळणार आहे. उद्या खरेदी केलेल्या समभागातधारकांना परतावा मात्र मिळू शकणार नाही.


या कंपन्यांचे समभाग एक्स डिव्हिंडट (Ex Dividend) देणारे म्हणून चर्चेत आहेत. सध्या चालू असलेल्या टी +१ सेटलमेंट पद्धतीने यांचे व्यवहार होणे अपेक्षित आहे. एचडीएफसी बँक,बजाज होल्डिंग व इनव्हेसमेंट लिमिटेड, केअर रेटिंग लिमिटेड, महाराष्ट्र स्कूटर्स, सिंजेने इंटरनॅशनल लिमिटेड, वेल्सस्पून लिविंग लिमिटेड व इतर काही कंपन्यानी लाभांश जाहीर केले होते. नोंदणी तारीख (Record Date) नुसार लाभांश सामान्यतः पकडला जातो. तारखेपासून लाभांशाची आकडेवारी करत हा व्यवहार ठरवला जातो.


याशिवाय आज एचडीएफसीने जाहीर केलेल्या लाभांशाचा अखेरचा दिवस आहे. आज २६ जून व त्यापूर्वी खरेदी केलेल्या समभागातधारकांना लाभांश मिळणार आहे त्यासाठीही आजची नोंदणी तारीख निश्चित केली गेली आहे. एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने २२ रूपये प्रति समभाग लाभांश (Dividend) जाहीर केलेला होता. त्याचा लाभ उद्या खरेदी केल्यास मिळणार नाही. बजाज होल्डिंगने २८ रूपयांचा तर केअरने ११ रूपयांचा, महाराष्ट्र स्कूटर्सने ६० रूपयांचा लाभांश जाहीर केला होता.


कुठल्या कंपन्यांनी किती लाभांश जाहीर केल्याची यादी पुढीलप्रमाणे -


कंपनी - नोंदणी तारीख शेवटची मुदत - लाभांश
अ‍ॅलाइड ब्लेंडर - २७ जून, २६ जून, ४ रूपये


अ‍ॅल्युफ्लोराइड  - २७ जून, २६ जून, ३ रूपये


बजाज फिनसर्व्ह - २७ जून,२६ जून. १ रूपये


बजाज होल्डिंग्ज -  २७ जून, २६ जून, २८ रूपये


भारत भूषण - २७ जून, २६ जून, १ रूपये


केअर रेटिंग्ज - २७ जून, २६ जून, ११ रूपये


सिप्ला - २७ जून २६ जून, १३ रूपये


एचडीएफसी बँक -  २७ जून,२६ जून, २२ रूपये


जयंत अ‍ॅग्रो ऑरगॅनिक्स - २७ जून, २६ जून ३ रूपये


महाराष्ट्र स्कूटर्स -२७ जून, २६ जून, ६० रूपये


इंद्रधनुष्य मुलांचे मेडिकेअर- २७ जून, २६ जून, ३ रूपये


RPG लाइफ सायन्सेस- २७ जून, २६ जून २ रूपये


स्काय इंडस्ट्रीज - २७ जून, २६ जून, १ रूपये


स्वराज इंजिन- २७ जून २६ जून १०५ रूपये


सिंजेने इंटरनॅशनल- २७ जून २६ जून, १ रूपये


वैभव ग्लोबल - २७ जून, २६ जून, २ रूपये


विसाका इंडस्ट्रीज - २७ जून, २६ जून, १ रूपये


वेलस्पन लिव्हिंग - २७ जून २६ जून,१ रूपये

Comments
Add Comment

शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाकडून चिमुरडीवर अत्याचार

बदलापूर : काही महिन्यांपूर्वी शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना बदलापूरमध्ये घडली होती. आता

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर

वॉशिंग्टन डीसी : अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडली आहे. जानेवारी २०२५ मध्येच ट्रम्प प्रशासनाने जागतिक

जिल्हा परिषदेच्या ७३१ जागांसाठी तब्बल ७ हजार ६९५ अर्ज

पंचायत समितीच्या निवडणुकीतही चुरस; १ हजार ४६२ जागांसाठी १३ हजार उमेदवार रिंगणात मुंबई : महापालिका निवडणुकीचा

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

राज ठाकरेंच्या परवानगीनेच शिवसेना आणि मनसेत युती

उबाठाचा दावा ठरला फोल; ठाकरे बंधूंच्या एकीवरही प्रश्नचिन्ह मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेत