अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या सोशल मीडियातील अस्तित्वाची चौकशी होणार

वॉशिंग्टन डी. सी. : अमेरिकेत जाण्याचे स्वप्न बघणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. आता अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांच्या सोशल मीडियातील अस्तित्वाची (Social Media P10resence) चौकशी होणार आहे. जगातील प्रत्येक व्यक्ती जी अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करेल त्याची किंवा तिची पोलीस चौकशी आणि सोशल मीडियातील अस्तित्वाची चौकशी होणार आहे. जर व्हिसाचा अर्ज करणाऱ्या विरोधात गुन्हे नोंदवले असतील तर त्या गुन्ह्यांचे स्वरुप बघितले जाईल. सोशल मीडियात संबंधित व्यक्ती अमेरिकेची समर्थक आहे की विरोधक हे बघितले जाईल. अमेरिकेच्या एखाद्या धोरणाला व्हिसाचा अर्ज करणाऱ्याकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विरोध होत असेल किंवा विरोध होईल अशी शक्यता वाटली तरी व्हिसा नाकारला जाणार आहे.



अमेरिकेच्या नव्या नियमानुसार व्हिसाचा अर्ज करणाऱ्याला मागील पाच वर्षातील सोशल मीडियातील स्वतःच्या अस्तित्वाची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. माहिती देताना फसवणूक केली अथवा दिशाभूल केली तरी व्हिसाचा अर्ज फेटाळला जाणार आहे. ज्यांचा व्हिसा अर्ज फेटाळला आहे त्यांना भविष्यातही अमेरिकेचा व्हिसा मिळण्याची शक्यता कमी होणार आहे.

अर्जदारांनी DS-160 व्हिसा अर्जावर मागील पाच वर्षात वापरलेल्या सर्व सोशल मीडिया अकाउंट / हँडल / पेज आदींची माहिती देणे बंधनकारक आहे. या माहितीआधारे संबंधित अर्जदाराच्या सोशल मीडियातील अस्तित्वाची चौकशी होणार आहे. अर्जदारांनी फॉर्मवर स्वाक्षरी करण्यापूर्वी आणि सबमिट करण्यापूर्वी त्यांच्या व्हिसा अर्जात दिलेली माहिती बरोबर असल्याचे प्रमाणित करावे, असाही नियम करण्यात आला आहे. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी आणि अखंडत्वासाठी ट्रम्प प्रशासनाने व्हिसा नियमात बदल केल्याचे जाहीर केले आहे.

 
Comments
Add Comment

अमेरिकेत घडत आहेत धक्कादायक घडामोडी; डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग

वाशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक

निमंत्रण धुडकावल्याने २०० टक्के टॅरिफ लादणार

‘गाझा बोर्ड ऑफ पीस’वरून ट्रम्प यांची फ्रान्सला धमकी वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ

ट्रम्पनी शेअर केला अमेरिकेचा नवा नकाशा, नकाशात कॅनडा आणि ग्रीनलँडचा समावेश

वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नकाशा शेअर केला आहे. या नकाशात ट्रम्प यांनी कॅनडा आणि

ट्रम्प वाढवताहेत जागतिक अस्वस्थता

अमेरिकेचे विक्षिप्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कधी कोणता निर्णय घेतील, कौतुक करता करता कधी पायाखाली घेतील, याचा

अयातुल्ला खाेमेनी यांच्यावर हल्ला म्हणजे थेट युद्धाला आमंत्रण

डोनाल्ड ट्रम्प यांना इराणचा इशारा तेहरान : इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी इराणचे सर्वोच्च नेते

विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र भारताचे गेट वे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या सर्व भागासाठी, वैविध्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक येणार दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन सज्ज,