Devendra Fadnavis Tariff News : गोड बातमी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वीज ग्राहकांना 'गिफ्ट' वीजदरात थेट 'इतक्याने' कपात !

  93

प्रतिनिधी: एक महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विद्युत शुल्काबाबत (Electric Tariffs) महत्वाचा निर्णय घेतला आहे.त्यासंबंधी घोषणा मुख्यमंत्री कार्यालयाने केली.मुख्यमंत्र्यांनी विजेच्या दरात १०% कपात केल्यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळालेला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी १०% दरात कपात होणार आहे व टप्याटप्याने पुढील पाच वर्षांत २६% दरकपात होऊ शकते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विद्युत खातेही असल्याने त्यांच्या मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन (MERC) विभागाने दिलेल्या आदेशाला मंत्रालयाने मंजूरी दिल्याने हा महत्वाकांक्षी निर्णय घेतला गेला.आर्थिक वर्ष २०२६ पासून हा निर्णय लागू होणार आहे असे परिपत्रकात नमूद केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात देताना म्हटले,'महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच वीज दर वाढवण्याऐवजी कमी केले जात आहेत. पहिल्या वर्षी १०% कपात करून, पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने वीज दर २६% ने कमी केले जातील.महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचा (MERC) आभारी आहे की महावितरणच्या प्रस्तावाला मान्यता दिली,असा निर्णय यापूर्वी कधीही घेतला गेला नव्हता.'याशिवाय मुख्यमंत्र्यांनी सांगितले,' राज्यातील ७०% जनता १०० युनिटहून कमी वीज वापरते.आ म्ही युद्धपातळीवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ला प्रारंभ केलेला आहे.'शेतकऱ्यांखेरीज समाजातील सगळ्या स्तरावरील जनतेला या योजनेचा लाभ होईल.' ज्यामध्ये सर्वसामान्य नागरिक,व्यवसायिक,औद्योगिक ग्राहकांचाही समावेश आहे.

मात्र मुंबईच्या ग्राहकांना लाभ नाही!

MERC मंडळाची परियोजना ही मुंबई सोडून उर्वरित भागात लागू होणार आहे मुंबईत वीजपुरवठा हा टाटा पॉवर,अदानी इलेक्ट्रिसिटी, बेस्ट यांच्याकडून होत असल्याने मुंबईत ही योजना लागू नसेल.

या योजनेअंतर्गत लाभार्थींना वीजेच्या बिलात सुट मिळाल्याने त्यांच्या वीजबिलात १०% कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या योजनेचा सर्वाधिक फायदा १०० युनिटहून कमी वीज वापरकर्त्यांना आणि मध्य व कनिष्ठ मध्यमवर्गाला होऊ शकतो.

या निर्णयाविषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना एमएसईडीसीएल (MSEDCL) चे कार्यकारी संचालक म्हणाले, '२०२९-३० पर्यंत सर्व निवासी वापरकर्त्यांसाठी दरांमध्ये घट होईल. उदाहरणार्थ, ३०१ -५०० युनिट्स वापराच्या श्रेणीमध्ये १३%, ०-१०० युनिट्स साठी २६% इत्यादींची घट आहे. स्मार्ट मीटरसाठी निवासी श्रेणीमध्ये सौर तासांमध्ये ८०% सूट आहे आणि अशा प्रकारे सर्व मासिक बिल विद्यमानपेक्षा कमी असतील. पूर्वी, आम्ही दरांमध्ये किमान १०% वाढ पाहिली होती यावर्षी आम्ही परिस्थिती बदलली आहे. पुढील पाच वर्षांत दरांमध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे कारण आम्ही सौर, जलविद्युत इत्यादींद्वारे अधिक हरित ऊर्जा खरेदी करत आहोत, ज्यामुळे वीज खरेदीमध्ये ६६,००० कोटी रुपयांची बचत होईल.'
Comments
Add Comment

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

सकाळच्या सत्रात शेअर बाजार दमदार ! आयटी, बँक, मिड स्मॉल कॅप शेअर्समध्ये रॅली सेन्सेक्स २६८.९७ व निफ्टी ७७.६४ अंकांने उसळला 'हे' आहे सकाळचे विश्लेषण!

मोहित सोमण: आज सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाली आहे. सकाळी गिफ्ट निफ्टीत वाढ झाल्यानंतर

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस, तासाभरात २० मिमी. पावसाची नोंद

मुंबई : मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईला झोडपलं. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा हजर

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री