British Navy Fighter Jet : केरळमध्ये अडकलं ब्रिटिश लढाऊ विमान, काय आहे रहस्य?

११० दशलक्षचं विमान, अद्याप जमिनीवर


सध्या इराण - इस्रायल, रशिया - युक्रेनमध्ये युद्धजन्य स्थिती आहे. नुकतंच भारत - पाकिस्तान युद्ध संपलंय. यात सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला होता तो लढाऊ विमानांचा. पण आज आपण पाहणार आहोत ११० दशलक्ष किमतीचं आणि भारताच्या भूमीत अडकलेलं ब्रिटिश रॉयल नेव्हीचं एक लढाऊ विमान. हे लढाऊ विमान केरळच्या तिरुवनंतपुरम विमानतळावर गेल्या १२ दिवसांपासून अडकलंय. जाणून घेऊयात त्याची कारणं


हे आहे ब्रिटिश रॉयल नेव्हीचं अत्याधुनिक लढाऊ विमान. त्याचं नाव आहे F-३५B लाईटनिंग II विमान. ११० दशलक्ष किमतीचं हे लढाऊ विमान अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन कंपनीनं बनवलंय. मात्र हेच लढाऊ विमान गेल्या १२ दिवसांपासून केरळच्या तिरुअनंतपुरम विमानतळावर अडकून पडलंय. १४ जूनच्या रात्री हे विमान केरळच्या किनाऱ्यापासून १०० नॉटिकल मैल अंतरावरून उड्डाण करत होतं. त्याच वेळी या अत्याधुनिक लढाऊ विमानाला इंधनाची कमतरता आणि खराब हवामानाचा सामना करावा लागला. त्यामुळे पायलटने तिरुअनंतपुरम विमानतळाशी संपर्क साधला आणि इमर्जन्सी लँडिंगसाठी परवानगी मागितली. भारतीय हवाई दलाच्या परवानगीनंतर रात्री ९:२८ वाजता हे विमान उतरलं. हे विमान HMS प्रिन्स ऑफ वेल्स या ब्रिटिश विमानवाहक नौकेवरून नियमित उड्डाण करत होतं. तसंच ते भारतीय हवाई संरक्षण क्षेत्राबाहेरही होतं. विमानाच्या लँडिंगनंतर ब्रिटिश तज्ज्ञांनी विमानाची तपासणी केली.


विमानातील तांत्रिक अडचण अद्याप दुरुस्त झालेली नाही. सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल या विमानाची देखरेख करत आहे. हे विमान भर पावसातही उघड्यावरच ठेवण्यात आलंय. लवकरच ३० तज्ज्ञांचं पथक दुरुस्तीसाठी येणार आहे, अशी माहिती ब्रिटिश उच्चायुक्तालयानं दिलीय. मात्र F-३५B च्या संरक्षित तंत्रज्ञानामुळे विमानाला हँगरमध्ये हलवण्यास ब्रिटिश नेव्हीने नकार दिलाय. भारताने हँगर उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र ब्रिटिश नेव्हीने नकार दिलाय. या घटनेमुळे सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून चिंता व्यक्त केली जातेय. जर दुरुस्ती शक्य झाली नाही, तर हे विमान लष्करी वाहतूक विमानाद्वारे परत नेलं जाऊ शकतं. भारतीय हवाई दल आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहेत. मात्र एवढं महागडं आणि अत्याधुनिक लढाऊ विमान तेही ब्रिटिश नेव्हीचं हे ऐकून स्थानिकांमध्ये उत्सुकता निर्माण झालीय. तर दुसरीकडे पावसामुळे विमान दुरुस्तीला अजून उशीर होण्याची शक्यता वर्तवलीय.

Comments
Add Comment

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या

आग्र्यात दुर्गा मातेच्या विसर्जनावेळी ६ जण बुडाले

दोन तरुणांचा मृत्यू, तर एकाला वाचवण्यात यश आगरामध्ये दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जन करत असताना ६ जण नदीमध्ये

आंध्र प्रदेशला चक्रीवादळाचा धोका

बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यामुळे चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला

जगाला हादरवणारी चीनची 'ती' धोकादायक मशीन... पण भारताने आकाशातच विणले सुरक्षा-जाल!

चीनने बनवले आकाशात तरंगणारे 'पवन टर्बाइन', तर भारताने 'स्ट्रेटोस्फीयर एअरशिप'ने सीमांवर ठेवलीय पाळत नवी दिल्ली: