ठाण्यात बॅनरबाजीचा झगमगाट

माजी नगरसेवकांच्या प्रचारातून निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी


ठाणे : गेल्या साडेतीन वर्षांपासून ठाणे महापालिकेमध्ये कोणताही अधिकृत नगरसेवक नसतानाही महापालिका प्रशासनाचा कारभार सुरळीतपणे सुरू आहे. मात्र निवडणुका न झालेल्या काळात देखील अनेक माजी नगरसेवक आणि राजकीय पदाधिकारी ‘आमच्याच प्रयत्नातून काम’ झाल्याचा दावा करत ठिकठिकाणी बॅनर लावून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे शहरात बॅनरबाजीचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे.


माजी नगरसेवकांनी लावलेल्या या बॅनर्सवर सार्वजनिक कामांचे श्रेय स्वतःकडे वळवण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसून येतो. ‘पाणी योजना पूर्ण – आमच्या प्रयत्नातून’, ‘रस्ता काँक्रीटीकरण – आमच्या पाठपुराव्याचा परिणाम’, अशा आशयाचे बॅनर्स नागरिकांच्या नजरेस पडत आहेत. विशेष म्हणजे, या बॅनर्समध्ये महापालिका प्रशासनाचा उल्लेखही नसतो, जणू सर्व निर्णय हे त्यांच्या 'सांगण्यावरूनच' झाले आहेत, असा त्याचा आभास निर्माण केला जातो.


मात्र या बॅनरबाजीमुळे संबंधित पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते मात्र दुखावले जात आहेत. ‘नगरसेवक नसतानाही केवळ पुढील निवडणुकीत उमेदवारी हवी म्हणून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी या प्रकारे एकहाती श्रेय लाटले जात आहे", अशी नाराजी काही कार्यकर्त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.


ठाणे शहरात कळवा, मुंब्रा, कोपरीपासून ते वागळे इस्टेट आणि घोडबंदर परिसरात अशा प्रकारच्या बॅनर्सचा सुकाळ झाला आहे. महापालिका निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय इच्छुक मंडळी ‘सक्रिय असल्याचे’ दाखवण्यासाठी नागरी कामांचे श्रेय घेताना दिसत आहेत. मात्र प्रत्यक्षात प्रशासक आणि अधिकारी यांच्या माध्यमातूनच सर्व योजना राबवल्या जात आहेत.


महापालिकेतील सत्ताविरहित कालावधीत नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अनेक निर्णय घेतले आहेत.

Comments
Add Comment

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण

ठाण्यात महाविकास आघाडीची ‘बिघाडी’?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा

नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’

दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या