Amitabh Bachchhan : सावधान! 'सायबर ठगी से बचें'...आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही

सरकारकडून सायबर फसवणुकीची कॉलर ट्यून झाली बंद...


नवी दिल्ली : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज सर्वांना आवडतो. पण,गेल्या काही काळापासून जेव्हा जेव्हा आपण एखाद्याला फोन करायचो तेव्हा अमिताभ बच्चन यांच्या गंभीर आणि दमदार आवाजात एक सूचना ऐकू येत होती. "सायबर फसवणुकीपासून सावध रहा...". आता हा आवाज तुम्हाला त्रास देणार नाही. कारण सरकारने ही जागरूकता मोहीम थांबवली आहे. कोविड काळात सुरू झालेला हा ऑडिओ संदेश भारत सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाचा एक उपक्रम होता. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या आवाजात नागरिकांना कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नका, त्यांचा ओटीपी शेअर करू नका आणि कोणत्याही कॉलवर बँकिंग तपशील देऊ नका असे सांगण्यात आले होते.

'सरकार को बोलो भाई, उन्होंने हमसे कहा सो किया'


सरकारचे हे पाऊल देशातील वाढत्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी होते जे अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रियतेशी जोडलेले होते. या संदेशाचा उद्देश लोकांना जागरूक करणे हा असला तरी, सोशल मीडियावर अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. विशेषतः जेव्हा हा संदेश आपत्कालीन कॉलच्या मध्यभागी येत असे, तेव्हा लोक अस्वस्थ व्हायचे. अशा परिस्थितीत, स्वतः अमिताभ बच्चन यांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला. एका ट्रोलरला उत्तर देताना अमिताभ बच्चन म्हणाले होते की, 'सरकार को बोलो भाई, उन्होंने हमसे कहा सो किया' परंतु ही कॉलर ट्यून सरकारच्या विनंतीवरून होती आणि ती बंद करण्याचा निर्णय सुद्धा सरकारी पातळीवर घेतला गेला आहे, ट्रोलर्समुळे नाही.


जबरदस्त चित्रपट


अमिताभ हे काळाबरोबर चालणारे अभिनेते आहे. आज सोशल मीडियाचं युग आहे आणि मेगास्टार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय आहे. अनेक वेळा ते त्याच्या चाहत्यांच्या कमेंट्सनाही उत्तर देतात, जसे त्यांनी आत्ताच दिलं आहेत. दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, बिग बी शेवटी 'कल्की २८९८ एडी' आणि 'वेट्टैयान'मध्ये दिसले आहे. आता पुढं ते 'सेक्शन ८४' या आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे, याशिवाय ते'ब्रह्मास्त्र' आणि 'कल्की २८९८ एडी'मध्ये झळकणार आहे.
Comments
Add Comment

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू

गिग वर्करचा बुधवारी देशव्यापी संप

ऑनलाइन डिलिव्हरी सेवांवर परिणाम होण्याची शक्यता नवी दिल्ली : नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांनी केलेल्या

नीट-जेईईत फसवणुकीला आळा बसणार

२०२६ पासून ‘चेहरेपट्टीची ओळख’ बंधनकारक नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश

२० जानेवारीपासून नितीन नवीन भाजपचे अध्यक्ष

नवी दिल्ली : नितीन नवीन यांना भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची घोषणा २० जानेवारी रोजी

लाल किल्ला स्फोट प्रकरणी एनआयएच्या तपासातून हाती आली धक्कादायक माहिती, २०२३ पासूनचा दहशतवाद्यांचा कट उघड

नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार स्फोटाच्या तपासात महत्वाची माहिती समोर आली

प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले हवीतच; चंद्राबाबू नायडूंचं विधान चर्चेत

तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी