उसळीतील कोंथिबीर वडी

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे


महाराष्ट्रीय स्वयंपाकघरात कोथिंबीर वडी ही एक झणझणीत, कुरकुरीत आणि सगळ्यांच्या आवडीची पारंपरिक डिश आहे. बहुतेक वेळा वड्या खाऊन उरतात आणि मग त्या कशा वापरायच्या, असा प्रश्न पडतो. अशावेळी आजी-आईंच्या स्वयंपाकघरातून आलेली एक सुंदर कल्पना म्हणजे – उरलेल्या कोथिंबीर वड्यांची झणझणीत उसळ! ‘उसळीतील कोंथिबीर वडी’ ही गावाकडची आणि विस्मरणात गेलेली मस्त झणझणीत रेसिपी आहे.


साहित्य


५-६ उरलेल्या कोथिंबीर वड्या (कापून)
१ मध्यम कांदा (बारीक चिरून)
२ टेबलस्पून ओले खोबरे (ऐच्छिक)
१ टीस्पून आलं-लसूण पेस्ट
१ टीस्पून मोहरी
१/२ टीस्पून हळद
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून गोडा मसाला / गरम मसाला
१ टीस्पून गूळ
१ चमचा तेल
मीठ चवीनुसार
पाणी – १ कप
कोथिंबीर सजावटीसाठी


‍कृती 


कढईत तेल गरम करून मोहरी टाका. मोहरी तडतडली की आलं-लसूण पेस्ट टाका आणि ३० सेकंद परतवा. मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतवा. हळद, तिखट, गोडा मसाला घालून नीट परतवा. १ कप पाणी आणि गूळ (ऐच्छिक आहे)घालून उकळी आणा. मीठ चवीनुसार टाका. उकळी आली की त्यात कापलेल्या कोथिंबीर वड्या घाला. मंद आचेवर ५-७ मिनिटं शिजू द्या, जेणेकरून वड्या रस्सा पिऊन मऊ होतील. वरून कोथिंबीर व खोबरं घाला. झाकण ठेवून २ मिनिटं वाफ येऊ द्या.


टीप : ही उसळ थोडी पातळ ठेवली तर कोथिंबीर वड्या रस्सा छान वाटतो. हवे असल्यास थोडे भरड दाणे घालून चव अजून वाढवता येते.

Comments
Add Comment

आज मला हसू कधी आलं?

मनातलं गायत्री डोंगरे खूप वेळा असं होतं…. दिवस संपतो, पण आपण काय अनुभवलं, याचा विचारच होत नाही. काय केलं, काय

स्वातंत्र्याची ऐशी तैशी

आरती रमेश कोचरेकर स्वातंत्र्य मग ते बोलण्याचे असो वा व्यक्त होण्याचे... ते तोंडाचे बोळके झाले तरी लवलवत राहते,

बुडत्याचा पाय खोलात

मीनाक्षी जगदाळे संक कॉस्ट फॅलसी ही मानवी वर्तणुकीशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची मनोवैज्ञानिक संकल्पना आहे.

सिनेमातील ‘सायकलचोर’

आशय वीणा सानेकर चित्रपटाची एक भाषा असते.ते दृश्य माध्यम असल्याने कॅमेरा तिथे खूप काही बोलत असतो हे तर खरेच. पण

परंपरेला आधुनिकतेचा साज

गायत्री डोंगरे मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यातील शेती संबंधित असा सण आहे. त्यामुळेच या दिवसांमध्ये शेतांत

साहित्यिक कर्मयोगिनी

कर्तृत्ववान ती राज्ञी : चित्रा कुलकर्णी मराठी साहित्यविश्वात गेली अनेक वर्षे निष्ठेने, सातत्याने आणि सामाजिक