Pune Metro Project : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! ३६२६ कोटींच्या निधीसह लाइन २ चा विस्तार, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी...

  43

पुणे :  पुणे करांसाठी आनंदाची बातमी, पुणे मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे, वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली-विठ्ठलवाडी या विस्तारित मार्गांना बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या दोन्ही मार्गांसाठी ३ हजार ६०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पुढील चार वर्षांत हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे (महामेट्रो) देण्यात आली आहे. मेट्रो २ च्या दुसऱ्या टप्प्याचे विस्तारीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. यामध्ये वनाझ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी या मार्गावर मेट्रोचा विस्तार केला जाणार आहे. पुण्यातील हा मार्ग सर्वात पहिल्यांदा सुरु करण्यात आला होता. परंतू, तो रामवाडी ते वनाझपर्यंतच होता. तो आता कोथरुडच्या दिशेने चांदणी चौक आणि रामवाडीच्या दिशेने विठ्ठलवाडीपर्यंत वाढविला जाणार आहे.


मेट्रो प्रकल्पात १३ नवीन स्थानकांचा समावेश...



केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार, पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात दोन मार्गांचा विस्तार करण्यात येणार आहे.  कॉरिडॉर २अ: वनाझ ते चांदणी चौक (१.१२ किमी), आणि  कॉरिडॉर २ब: रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (११.६३ किमी) असा स्थानकांचा पल्ला असणार आहे.  या दोन्ही मार्गांवर मिळून एकूण १३ नवीन स्थानके उभारली जाणार आहेत. या विस्तारीकरणामुळे चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोली यांसारखी वेगाने विकसित होणारी उपनगरे थेट मेट्रोच्या जाळ्याने जोडली जाणार आहेत, ज्यामुळे लाखो पुणेकरांचा दैनंदिन प्रवास सुकर होणार आहे.


मेट्रोचे जाळे ८० किमीपर्यंत विस्तारणार...


प्रवाशांनी यापूर्वी  मेट्रोसाठी वारंवार मागणी केली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले आहे. मुंबई किंवा सातारा येथून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अथवा खासगी प्रवासी वाहनांनी येणाऱ्या नागरिकांना चांदणी चौकापासून मेट्रो मिळाली, तर त्यांना शहराच्या सर्व भागांत ये-जा करणे शक्य होणार आहे. त्यासाठी या विस्तारित मार्गाची गरज व्यक्त केली जात होती. या दोन्ही मार्गांना मान्यता दिली गेल्याने पुणे शहरातील एकूण मेट्रोचे जाळे ८० किमीपर्यंत विस्तारणार आहे.




Comments
Add Comment

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’

बुलेट ट्रेनसाठी साबरमती नदीवर ३६ मीटर उंच पुलाची उभारणी

अभियांत्रिकी क्षेत्रात पूल ठरणार चमत्कार अहमदाबाद : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरु आहे.

तुळजाभवानी मातेची तलवार गहाळ! स्थानिक पुजाऱ्यांनी दिली माहिती

तुळजापूर:  तुळजाभवानी मंदिरातील खजिना खोलीतून शस्त्र पूजनासाठी वापरली जाणारी विशेष तलवार गहाळ झाली आहे, असे

रेव्ह पार्टी करणाऱ्या पतीसाठी कायपण! रोहिणी खडसेंची प्रांजल खेवलकरला वाचवण्यासाठी धडपड

पुणे: पुण्यातील उच्चभ्रू सोसायटी रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी मारलेल्या छापेमारीत एकनाथ खडसे यांचे जावई

Pune Accident: पुण्यात खड्ड्याने घेतला वृद्धाचा जीव, यंत्रणेचा निष्काळजीपणा की हेल्मेटचा अभाव?

पुणे:  पुण्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यामुळे एका ६१ वर्षीय वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ते