School Holidays List : यंदा शाळांना १२८ दिवस सुट्ट्या; शिक्षण विभागाने केली यादी जाहीर!

  221

शालेय शिक्षण विभागाने वर्षभरातील सुट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार शाळा तथा विद्यार्थ्यांना ५२ रविवार वगळून वर्षभरात एकूण ७६ सुट्या असणार आहेत. त्यात दीवाळीच्या १० दिवस (१६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत) आणि उन्हाळ्याच्या ३८ दिवस (२ मे ते १३ जूनपर्यंत) सुट्या असणार आहेत. जिल्हा परिषदेची शाळा सकाळी १०.३० वाजता भरणार आहे आणि संध्याकाळी ५ वाजता सुटणार आहे. तर अर्धवेळीची शाळा नऊ ते दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे. शाळेच्या दिवशी ६० मिनिटांची सुट्टी असणार आहे. तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात १०-१० मिनिटांच्या दोन सुट्ट्या असणार आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांची नियमित वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ अशी असणार आहे. अर्ध्यावेळेची शाळा सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत भरेल, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शाळेच्या कामकाजादिवशी ६० मिनिटांची मोठी सुटी तर पहिल्या व दुसऱ्या सत्रात १० मिनिटांच्या दोन सुट्या राहतील. दुबार पद्धतीने शाळा भरत असल्यास दहा मिनिटांची लहान आणि ३५ मिनिटांची मोठी सुटी असणार आहे.

अशा आहेत वर्षभरातील सुट्ट्या

  • जुलै : आषाढी एकदशी, मोहर्रम, नागपंचमी
  • ऑगस्ट : रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी
  • सप्टेंबर : गौरी विसर्जन, ईद-ए- मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना
  • ऑक्टोबर : गांधी जयंती आणि दिवाळी
  • नोव्हेंबर : गुरूनानक जयंती
  • डिसेंबर : ख्रिसमस- नाताळ
  • जानेवारी : मकरसंक्रांती, शब्बे- ए- मेराज, प्रजासत्ताक दिन
  • फेब्रुवारी : शब्बे-ए-बरात, महाशिवरात्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती
  • मार्च : धुलिवंदन, रंगपंचमी, शब्बे-ए-कदर, गुढी पाडवा, रमजान ईद, रामनवमी, महावीर जयंती
  • एप्रिल : गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
  • मे : महाराष्ट्र दिन, उन्हाळा सुट्टी
Comments
Add Comment

Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत

खडसेंच्या जावयावर आणखीन एक गुन्हा दाखल, महिलेचे चोरून फोटो अन् व्हिडिओ काढले...

प्रांजल खेवलकरच्या अडचणीत वाढ पुणे: एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकरच्या अडचणीत

Manoj Jarange Patil : मुंबई दौऱ्याआधीच जरांगेंची तब्येत बिघडली! नेमकं काय घडलं?

डॉक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला नांदेड: मराठा आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष संघर्ष करत असलेले मनोज

स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिग्गजांचा अजित पवारांनी केला सत्कार

बीड : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी व

आंबा घाटात दरड कोसळली ! वाहतूक ठप्प

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय तर वाहतुकीचे हे बदल पाहा

गणपती म्हटलं की कोकणकर गावाला जाणार नाही असं होत नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे त्रासदायक असणारा मार्ग म्हणजे